News Flash

‘राधे’साठी सलमानने तोडली ‘No kiss’ पॉलिसी, ट्रेलरमधील त्या सीनची चर्चा

सलमानने आजवर कोणत्याही चित्रपटात किसिंग सीन दिलेला नाही.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’चा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला. सध्या हा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेत आहे. ट्रेलरमध्ये सलमान खान अभिनेत्री दिशा पटाणीसोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. तसेच त्याने किसिंग सीन देखील दिला आहे.

सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून ‘राधे’चा ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरमध्ये सलमानची एक वेगळीच झलक पाहायला मिळते आहे. ट्रेलरमध्ये मुंबईत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याचे दाखवण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिस अधिकारी असलेला राधे म्हणजेच भाईजान सलमान मुंबईतील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळताना दिसणार आहे. दरम्यान सलमान दिशा पटाणीसोबत फ्लर्ट करताना दिसत असून त्याने एक किसिंग सीन शूट केला आहे. ट्रेलरमधील हा सीन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सलमानने आजवर कोणत्याही चित्रपटात किसिंग सीन दिलेला नाही. सलमानने यापूर्वी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते लाजाळू स्वभावामुळे तो इंटिमेट आणि किसिंग सीन देत नाही. पण आता ‘राधे’ चित्रपटात पहिल्यांदाच सलमानने किसिंग सीन दिल्यामुळे चर्चा रंगल्या आहेत.

सलमान आणि दिशाने यापूर्वी ‘भारत’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटातील गाणे ‘स्लो मोशन’मध्ये दिशाने सलमानच्या गालावर किस केले होते. त्यावेळी हा सीन चर्चेत होता. एका मुलाखतीमध्ये सलमानने हा सीन करण्यास नकार दिल्याचे सांगितले होते.

‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाची निर्मिती प्रभु देवाने केली आहे. या चित्रपटात सलमान एकदम वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणी २०१९मध्ये करण्यात आली होती. २०२०मध्ये ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता अखेर हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 4:25 pm

Web Title: salman khan ends his no kissing policy as he locks lips with disha patani in radhe trailer avb 95
Next Stories
1 अभिनेत्री अश्विनी भावे यांनी साजरा केला वसुंधरा दिन; घरासमोरील अंगणात वृक्षारोपण
2 ‘एक पल का जीना’वर आशा भोसले यांनी केला हृतिकसारखा डान्स
3 सनी लिओनीच्या मुलीला पाहून नेटकरी म्हणाले; “लहान असून निशा किती…”
Just Now!
X