News Flash

बहीण अर्पिताबरोबर सलमान खानची उदयपूरमध्ये ‘बोट राईड’

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान सध्या 'प्रेम रतन धन पायो' या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

| April 13, 2015 03:34 am

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान सध्या ‘प्रेम रतन धन पायो’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाचे उदयपूरमध्ये चित्रीकरण सुरु असून, सलमानची बहिण अर्पिता आणि तिचा पती आयुषने चित्रीकरणस्थळी जाऊन सलमानची भेट घेतली. त्यानंतर तिघांनी राजेराजवाड्यांच्या या शहरात बोटीने प्रवास करण्याचा आनंद लुटला. बोट प्रवासादरम्यानची छायाचित्रे अर्पिता खान शर्माने सोशल मीडियावर शेअर केली आहेत. अर्पिताने शेअर केलेल्या या छायाचित्रांमध्ये सलमान खान बोटीच्या प्रवासाची मजा लूटताना, निसर्ग सौंदर्य कॅमेऱ्यात टिपताना आणि माकडांच्या फौजेला खाऊ घालताना दिसतो.

salman-khan-boat-embed

salmankhan-ayeush-embed

salman-monkeys-embed

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2015 3:34 am

Web Title: salman khan enjoys boat ride in udaipur with sister arpita
टॅग : Arpita Khan,Salman Khan
Next Stories
1 पाहा: गायक मिका सिंगने डॉक्टरच्या लगावली श्रीमुखात!
2 मराठी चित्रपटांना प्राईम टाईम द्यायचा की नाही, हे महाराष्ट्रातील प्रेक्षकांनाच ठरवू दे- अनुपम खेर
3 कोर्टबाजी!
Just Now!
X