News Flash

‘काही दिग्दर्शकांनी माझ्यासोबत…’, सलमानवर आरोप करणाऱ्या सोमी अलीचा आणखी एक खुलासा

तिने एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

सध्या बॉलिवूड अभिनेत्री सोमी अली चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने फसवणूक केल्याचा आरोप केला होता. इतकच नव्हे तर तिने एका मुलाखतीमध्ये तिचे बॉलिवूडमधील करिअर, अभिनय यासंबंधीत देखील अनेक खुलासे केले आहेत. बॉलिवूडमधीन दिग्दर्शकांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले असे देखील ती म्हणाली.

सोमी नुकताच एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने, ‘काही दिग्दर्शकांनी माझ्यासोबत गैरवर्तन केले. माझ्या काही मित्रमैत्रीणींनी मला पुन्हा बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याचा सल्ला दिला होता. पण पुन्हा इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची माझी इच्छा नाही. मला माझ्या भूतकाळाची पुनरावृत्ती करायची नाही’ असे तिने म्हटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Somy Ali (@realsomyali)

आणखी वाचा: ‘१४ वर्षांची असताना माझ्यावर बलात्कार झाला होता’, सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचा खुलासा

यापूर्वी सोमीने सलमानसोबत झालेल्या ब्रेकअपवर वक्तव्य केले होते. २० वर्षांपूर्वी तिचा आणि सलमानचा ब्रेकअप झाला असं ती म्हणाली. दरम्यान तिने सलमान मला फसवत असल्याचं कळाल्याने मी त्याच्यापासून दूर गेले असे म्हटले होते. ‘मी गेली कित्येक वर्षे सलमानशी बोलले नाही. बऱ्याच वेळा तुमच्या आयुष्यात येणारे लोकं तुम्हाला खूप काही शिकवून जातात. आपण नेहमी भूतकाळातील गोष्टी विसरुन पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा’ असे सोमी म्हणाली होती.

सोमी अलीने वयाच्या १६व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने ९०च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले. सोमी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची गर्लफ्रेंड होती. पण १९९९मध्ये सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिने इंडस्ट्रीला रामराम ठोकला. ती परदेशात जाऊन राहू लागली. आता सोमी पुन्हा एकदा चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 1:29 pm

Web Title: salman khan ex girlfriend somy ali reveals that she had bad experience bollywood directors avb 95
Next Stories
1 ‘अत्यंत घाण भाषेत कलाकार सुद्धा…’, शशांक केतकर ट्रोलरवर संतापला
2 ‘फ्रेंड्स’ पुन्हा येतायत…तेही एका मोठ्या सरप्राईझसह!
3 ‘जेठालाल’ने घेतली करोना लस, फोटो पोस्ट करत म्हणाले…
Just Now!
X