भारतात करोनाची दुसरी लाट आली आहे. दिवसेंदिवस करोना रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढत आहे. अनेकांनी त्यांच्या कुटुंबाला गमावले आहे. अशात अनेक बॉलिवूड कलाकार गरजूंच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. तर अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा गरजूंच्या मदतीसाठी पुढे आला आहे. आता त्याने करोनामध्ये अनाथ झालेल्या मुलासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

सलमान खानने आता पर्यंत बीएमसीसोबत मेडिकल किट देण्यापासून फ्रंटलाइन कामगारांपर्यंत अनेकांना मदत केली आहे. आता सलमानने कर्नाटक मधील एका १८ वर्षाच्या विद्यार्थ्याला मदत केली आहे. त्या मुलाच्या वडिलांचे करोना संक्रमणाने निधन झाले.

सलमानसोबत करोना संक्रमण झालेल्या नागरिकांना मदत करणाऱ्या युवा सेनेचे नेते राहुल एस. कानल यांनी ही माहिती दिली आहे. “सलमानने या मुलाच्या खाण्या पिण्याचा आणि शैक्षणिक वस्तूंची संपूर्ण व्यवस्था केली असल्याचे त्याने सांगितले आहे. जेव्हा पण या विद्यार्थ्याला मदतीची गरज असेल तेव्हा सलमान कधी माघार घेणार नाही,” असेही ते म्हणाले. सलमानसोबत अनेक बॉलिवूड कलाकारांनी या कठीन परिस्थितीत पुढे येऊन गरजूंना मदत केली आहे.

दरम्यान, सलमानचा ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’ १३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत दिशा पटानी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.