News Flash

सलमान आणि सुशांतचा जुना व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचा केआरकेवर निशाणा

त्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सलमान आणि सुशांतचा जुना व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचा केआरकेवर निशाणा

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. ‘छिछोरे’ चित्रपटात काम करणाऱ्या सुशांतने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर बिहारमध्ये बॉलिवूडमधील एकता कपूर, करण जोहर, संजय लीला भन्साली, सलमान खान अशा आठ लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर सोशल मीडियावर घराणेशाही हा वाद सुरु झाला. दरम्यान अभिनेता कमाल आर खानने ट्विट करत सलमानवर निशाणा साधला होता. आता सलमान आणि सुशांतचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांनी केआरकेला फेक म्हटले आहे.

नेटकऱ्यांनी सुशांत आणि सलमानचा बिग बॉसमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सुशांत ‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री सारा अली खानसोबत बिग बॉसमध्ये पोहोचला होता त्या वेळचा आहे. या व्हिडीओमध्ये सलमान आणि सुशांत मजा मस्ती करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ शेअर एका यूजरने, ‘सलमानने सुशांतला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसमध्ये बोलवले होते. जर सलमानला सुशांत आवडत नसता तर त्याने त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला किंवा बिग बॉसमध्ये सुशांतला का बोलावले असते. #FakeKRKRealCulpritOfSushant’ असे म्हटले आहे.

तसेच सुशांत आणि सलमानचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघेही नाचताना दिसत आहेत.

१४ जून रोजी सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही दिवसांपासून सुशांत नैराश्यात होता आणि म्हणूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. पण याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2020 7:40 pm

Web Title: salman khan fan praises him and slams krk by sharing old video of ssr having fun with bhaijaan avb 95
Next Stories
1 क्वारंटाईनमुळे चित्रपट निर्मात्याची आत्महत्या; २७व्या मजल्यावरुन उडी घेत संपवलं आयुष्य
2 ‘breathe in to the shadows’चा टीझर प्रदर्शित; पाहा व्हिडीओ
3 फोटोतल्या ‘या’ चिमुकलीला ओळखलं का? आज आहे कलाविश्वातील लोकप्रिय गायिका
Just Now!
X