News Flash

सलमानचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा? भाईजानच्या ‘या’ फोटोची होतेय सोशल मीडियावर चर्चा

शेतकरी आंदोलनाला सलमानचा पाठिंबा?

बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या चित्रपटांबरोबरच पर्सनल लाइफमुळेदेखील कायमच चर्चेत असतो. अनेकदा तो सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. अलिकडेच सलमानने इन्स्टाग्रामवर त्याचा एक फोटो शेअर केला आहे. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सलमानने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याने हातात फावडं घेतलं असून तो शेतात काम करताना दिसत आहे. सध्या दिल्ली सीमेवर पंजाब हरयाणाचे शेतकरी आंदोलन करत आहेत. याच काळात सलमानने शेती करतानाचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे त्याच्या या फोटोची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे त्याचा हा फोटो पाहिल्यानंतर सलमानने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे की काय अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमानने या फोटोला Mother earth असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोला आतापर्यंत १३ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. त्यासोबतच या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

वाचा : शहनाज गिलचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; मिळाले १६ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज

दरम्यान, शेती करताना सलमानचा हा पहिला फोटो नसून यापूर्वीदेखील त्याने शेती करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. यात त्याचे भात लावणी करताना, ट्रॅक्टर चालवतानाचे फोटो चर्चेत आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 11:01 am

Web Title: salman khan farming photo goes viral as actor shares it on internet says mother earth ssj 93
Next Stories
1 सैफ अली खानने काढला नवा टॅट्यू?
2 Video: ‘पुरुषांवरील घरगुती हिंसाचार मान्य केला जाणार नाही’, पूजा बेदीचा ‘त्या’ जाहिरातीवर आक्षेप
3 बिकिनीतील फोटोंवरून ट्रोल करणाऱ्यांवर ‘तारक मेहता..’मधील सोनू भडकली, म्हणाली..
Just Now!
X