19 October 2019

News Flash

Photo : ‘भारत’मधील वयोवृद्ध सलमान खानचा फर्स्ट लूक

ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच ५ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सलमान खान

अभिनेता सलमान खानच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘भारत’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित झाला आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटातील सलमानचा हा लूक लक्षवेधी ठरतोय. सलमानसोबतच यामध्ये अभिनेत्री कतरिना कैफसुद्धा मुख्य भूमिकेत आहे. यावर्षी ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच ५ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘देश आणि एका व्यक्तीचा एकत्रित प्रवास,’ अशी टॅगलाइन या पोस्टरवर लिहिली आहे. वयोवृद्ध लूकमधील हा पोस्टर शेअर करत सलमानने लिहिले, ‘जितने सफेद बाल मेरे सिर और दाढी मै है, उससे कई ज्यादा रंगीन मेरी जिंदगी रहीं है.’ सलमानच्या या पोस्टरने नक्कीच चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे. या पोस्टरमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि जॅकी श्रॉफसुद्धा पाहायला मिळत आहेत.

२०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” दक्षिण कोरियन चित्रपटावर भारत आधारलेला आहे. ‘भारत’ चित्रपटात रशियन सर्कस आणि अन्य काही साहसी दृश्य पाहायला मिळणार आहेत. ‘भारत’मध्ये दिशा पटानी, नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत.

First Published on April 15, 2019 11:36 am

Web Title: salman khan first look poster of bharat directed by ali abbas zafar released