News Flash

‘या’ खास व्यक्तीला सलमान करतो इन्स्टाग्रामवर फॉलो

इन्स्टाग्रामवर सलमान फक्त तीन लोकांना फॉलो करतो.

सलमान खान

बॉलिवूडचा ‘दबंग’ खान अर्थात सलमान सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरून विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करत तो सतत चाहत्यांच्या संपर्कात असतो. सलमानच्या फॉलोअर्सची संख्यासुद्धा सर्वाधिक आहे. मात्र, इन्स्टाग्रामवर सलमान स्वत: फक्त तीन लोकांना फॉलो करतो. या तीन जणांमध्ये एका खास व्यक्तीचाही समावेश आहे.

इन्स्टाग्रावर सलमानचे सोळा दशलक्षाहूनही अधिक फॉलोअर्स आहेत पण सलमान मात्र फक्त तिघांना फॉलो करतो. त्यापैकी एक म्हणजे कतरिनाची बहिण इसाबेल कैफ. काही महिन्यांपूर्वीच सलमानने इसाबेलला फॉलो केलं आणि तेव्हा अनेकांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. कारण कतरिना आणि सलमानचं नाव जोडलं जात असतानाच तिला सोडून तिच्या बहिणीला सलमान का फॉलो करतोय असा प्रश्न अनेकांना पडला. त्यानंतर आता दुसरी व्यक्ती म्हणजे लुलिया वंतूर. सलमान आणि लुलिया वंतूर एकमेकांना डेट करत असल्याच्या बऱ्याच चर्चा ऐकायला मिळतात. किंबहुना बऱ्याच ठिकाणी या दोघांना एकत्र पाहिलं जातं. सलमानच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्येही लुलियाची आवर्जून हजेरी असते. त्यामुळे आता इन्स्टाग्रामवर सलमान लुलियाला फॉलो करू लागल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

वाचा : सारा खानचा न्यूड व्हिडिओ बहिणीकडून चुकून सोशल मीडियावर पोस्ट 

इन्स्टाग्रामवर सलमान आणखी एका मुलीला फॉलो करतो, जी स्वत: बिस्कीटं बनवून विकते आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांचा वापर परोपकारी कार्यासाठी करते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 7:23 pm

Web Title: salman khan follows someone special on instagram and it will leave you surprised
Next Stories
1 दिशाचा ‘हा’ व्हिडिओ होतोय चांगलाच व्हायरल!
2 सलमानच्या हत्येची सुपारी घेणाऱ्याला अटक, सलमानच्या सुरक्षेत वाढ
3 ..म्हणून दिव्यांकाच्या बचावासाठी विवेक आला धावून!
Just Now!
X