News Flash

VIDEO: सलमान आणि छोट्या अहिलची ‘सुलतान’गिरी

छोटा अहिल आपल्या मामाच्या गाण्यांना प्रतिसाद देताना दिसतो.

सलमान खान आणि लहान मुले हे समीकरण तर त्याच्या चाहत्यांना चांगलेच माहित आहे. नुकताचं त्याच्या छोट्या भाच्यासोबतचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर आला आहे.
बहुप्रतिक्षित ‘सुलतान’ हा चित्रपट उद्या सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची उत्सुकता जितकी सलमानला आहे तितकीच उत्सुकता त्याच्या नातेवाईकांनादेखील आहे. सलमानची लहान बहिण अर्पिताचा पती आयुष शर्मा याने अहिल आणि सलमानचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या ५० सेकंदाच्या व्हिडिओमध्ये छोटा अहिल आपल्या मामाच्या गाण्यांना प्रतिसाद देताना दिसतो. सलमान सुरुवातील ‘मै हू हिरो तेरा हे’ गाणं बोलतो तेव्हा अहिलच्या चेह-यावर असलेलं हसू आपलं लक्ष वेधून घेतं. त्यानंतर ‘सुलतान’च्या टायटल साँगवर या मामा-भाच्याने ताल धरलेलाही यात पाहावयास मिळतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2016 11:01 am

Web Title: salman khan gears up for sultan this time in the cutest way possible
Next Stories
1 ‘रुस्तमच्या’ रेडिओ ट्रेलरने गाठला थेट १९५९ चा काळ
2 झाले-गेले विसरत कपिलच्या मोहल्ल्यात ‘सुलतानची’ हजेरी
3 Akash Thosar:’सैराट’ फेम ‘परशा’ आणि ‘बॉलीवूड’च्या ‘सुलतान’ची भेट..
Just Now!
X