07 August 2020

News Flash

फेसबुकवर सलमानचे एक कोटी ९० लाख फॉलोअर्स!

ईदला प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या 'किक' चित्रपटाने घवघवीत यश संपादन केले. 'किक'च्या यशाने सध्या अतिशय खुष असलेल्या या बॉलिवूडच्या सुपरस्टारचा आनंद द्विगुणीत करणारी...

| August 19, 2014 07:33 am

ईदला प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘किक’ चित्रपटाने घवघवीत यश संपादन केले. ‘किक’च्या यशाने सध्या अतिशय खुष असलेल्या या बॉलिवूडच्या सुपरस्टारचा आनंद द्विगुणीत करणारी आणखी एक घटना घडली आहे. टि्वटर आणि फेसबुक या सोशलमीडिया वेबसाईटवर कार्यरत असलेल्या सलमान खानच्या फेसबुकवरील चाहत्यांचा आकडा १९,०५५,८६७ इतका झाला असून, त्यात सतत वाढ होत आहे. जसा सलमानने एक कोटी ९० लाखांचा पल्ला पार केला, तसा #19MillionSalmaniacsOnFB हा हॅशटॅग टि्वटरवर ट्रेन्ड होण्यास सुरुवात झाली. फेसबुकवरील सलमानच्या या कामगिरीने सुपरस्टार शाहरूख खान आणि मेगास्टार अमिताभ बच्चनला मागे टाकले. फेसबुकवर शाहरूखचे १,०४,२३,४४६ फॉलोअर्स आहेत, तर बीग बींचे १,४९,६१,३२१ फॉलोअर्स आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2014 7:33 am

Web Title: salman khan gets 19 million followers on facebook fans make him trend on twitter
Next Stories
1 ‘थरथराट’ चित्रपटाचे रौप्यमहोत्सवी वर्ष
2 ‘विटीदांडू’चा पहिला खेळ परदेशात
3 बिकनी घालणे माझ्यासाठी मोठी बाब नाही – बिपाशा बासू
Just Now!
X