21 March 2019

News Flash

Video: वडिलांचा मेसेज पाहून सेटवरच रडला सलमान खान

'दस का दम' शोमध्ये सलमान नेहमीच मजा- मस्तीच्या मूडमध्ये दिसतो

सलमान खान, सलीम खान

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या ‘रेस- ३’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. एकीकडे सिनेमाचे प्रमोशन आहे तर दुसरीकडे ‘दस का दम’ या रिअॅलिटी शोचे चित्रीकरणही आहे. या गेम शोमध्ये सलमानचा अनोखा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. सलमान जवळपास १० वर्षांनी या शोचे सूत्रसंचालन करत आहे.

शोमध्ये सलमान नेहमीच मजा- मस्तीच्या मूडमध्ये दिसतो. पण यावेळी सेटवर असे काही झाले की सलमान स्वतःचे अश्रू रोखू शकला नाही. त्याचे झाले असे की, ‘दस का दम’च्या निर्मात्यांनी सलीम खान यांना सलमानसाठी दोन शब्द बोलण्याची विनंती केली होती. जेव्हा सलीम खान यांचा व्हिडिओ सेटवर चालवण्यात आला तेव्हा सलमानचे डोळे भरून आले.

या व्हिडिओमध्ये सलीम म्हणाले की, ‘वडील आणि मुलाचे नाते कसे असते हे कोणीही सांगू शकत नाही. मी फक्त देवाकडे त्याच्यासाठी एवढंच मागेन की देवाने त्याला इज्जत आणि चांगलं आयुष्य द्यावं. पैसे आम्ही कमवू शकतो.’ वडिलांकडून आलेला हा मेसेज पाहून सलमान फार भावूक झाला आणि तो सेटवरच रडायला लागला.

काही दिवसांपूर्वी सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे मुंबई पोलिसांनी त्याची सुरक्षा वाढवली आहे. हरियाणा पोलिसांनी कुख्यात गुंड संपतला या प्रकरणात अटक केली आहे. संपत शार्पशूटर असून त्याने सलमानच्या घराची रेकीही केली होती. सलमानला त्याच्या घराच्या परिसरातच मारण्याचा कट तो रचत होता.

First Published on June 14, 2018 11:52 am

Web Title: salman khan gets emotional for salim khan on sets of dus ka dum