26 September 2020

News Flash

सलमानकडून ‘दबंग ३’च्या सहकलाकाराला आलिशान BMW गिफ्ट

सलमान स्वत: ही कार चालवत सुदीपच्या घराजवळ पोहोचला.

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खानचा दिलदारपणा सर्वांनाच ठाऊक आहे. सलमान त्याच्या सहकलाकारांना नेहमीच खूश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या ‘दबंग ३’ या चित्रपटातील सहकलाकार व प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप याला सलमानने काही दिवसांपूर्वीच खास जॅकेट भेट दिली होती. त्यानंतर आता सलमान चक्क आलिशान BMW कार घेऊनच त्याच्या घरी पोहोचला. ही कार सलमानने सुदीपला भेट म्हणून दिली आहे. या कारचे फोटो सुदीपने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत भाईजानचे आभार मानले आहेत.

‘तुम्ही चांगलं काम केलात तर तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतात’, असं कॅप्शन देत सुदीपने कारचे फोटो पोस्ट केले आहेत. सलमान स्वत: BMW M5 ही कार घेऊन सुदीपच्या घरी आला. सुदीपसाठी हा खूप मोठा सरप्राइज होता. काही दिवसांपूर्वी सलमानने त्याच्या घरातील पाळीव कुत्र्याचा फोटो असलेला खास जॅकेट सुदीपला दिला होता.

आणखी वाचा : ..म्हणून शाहरुख, आमिर आणि मी कधीच एकत्र काम करू शकणार नाही- सलमान खान

किच्चा सुदीपने सलमानच्या ‘दबंग ३’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात सलमान, किच्चा सुदीपसोबतच सई मांजरेकर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. २० डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींहून अधिक रुपये कमावले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2020 6:36 pm

Web Title: salman khan gifts a brand new car to his dabangg 3 co star kiccha sudeepa see pics ssv 92
Next Stories
1 Video : भर बाजारात फिरुनही दीपिकाला कोणीच ओखळू शकलं नाही
2 मृत्यृनंतरही ‘मायकल जॅक्सन’चाच दबदबा, ‘फोर्ब्स’नेही घेतली दखल
3 सलमानला मागे टाकत ‘हा’ ठरला बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता
Just Now!
X