News Flash

सलमान खानची प्रेयसी लुलियाने शेअर केला तिच्या मुलीचा फोटो

तिने हा फोटो इन्स्ट्राग्रामवर शेअर केला आहे

सलमान खान आणि त्याची प्रेयसी लुलिया वंतूर यांच्या प्रेमसंबंधांबद्दल आतापर्यंत अनेक चर्चा सिनेसृष्टीत झाल्या आहेत. दोघंही लवकरच लग्न करतील अशाही बातम्या आल्या आहेत. पण आजची बातमी ही त्यांच्या लग्नाची नाही. तर नुकताच लुलियाने तिच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने हा फोटो इन्स्ट्राग्रामवर शेअर केला आहे.
या फोटोमध्ये लुलिया आपल्या मुलीसोबत दिसत आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की लुलियाला मुलगीही आहे का? या गोड मुलीला लुलिया आपल्या मुलीसारखी मानत असली तरी ही तिची मुलगी नाही. ही तिच्या मैत्रिणीची मुलगी आहे. जिच्याबरोबर वेळ घालवणं तिला फार आवडतं. लुलिया सध्या मुंबईत नसून रोमानियामध्ये आहे. व्हिसाची मुदत संपल्यामुळे तिसा परत रोमानियाला जावे लागले. तरीही ती लवकरच भारतात परतेल अशी आशा करायला हरकत नाही.

बॉलीवूडचा सुलतान सलमान खान आणि त्याची तथाकथित प्रेयसी लुलिया वंतुर हे अद्यापही त्यांच्या नात्याबाबत सर्वांसमोर काहीच बोलले नाहीत. पण या दोघांबाबत अशा काही ना काही गोष्टी समोर येतात की त्यामुळे त्यांचे एकमेकांशी नाव जोडले जाते. नुकतीच हे तथाकथित प्रेमीयुगुल लडाखला गेले होते. सलमान हा कबीर खानच्या आगामी ‘ट्युबलाइट’ सिनेमासाठी लडाखला गेला होता. दरम्यान, त्याने लुलियाच्या आई-वडिलांनाही लडाखमध्ये फिरवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिनेमाच्या शूटींगनंतर सलमान लुलियाच्या आई-वडिलांना जवळपासच्या भागात फिरण्यासाठी नेत असल्याचे कळले होते.

Pure love #innocence #child #mygoddaughter #childhoodfriend #friendshipforlife #blessed #strongconnection #love #unconditional #

A photo posted by Iulia Vantur Official Account (@vanturiulia) on

I love her!!! Amazing energy, the most beautiful smile, she makes everyone feel special. Thank u @realpz , u are the best 😘❤️

A photo posted by Iulia Vantur Official Account (@vanturiulia) on

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 8:52 pm

Web Title: salman khan girlfriend lulia vantur share pics with daudhter
Next Stories
1 कपिल शर्मा-इरफान खानला होऊ शकते ३ वर्षांची शिक्षा
2 मिलिंद सोमणच्या नावे अजून एक रेकॉर्ड
3 या चित्रपटातून पुन्हा पाहता येणार सलमान आणि कतरिनाची केमिस्ट्री
Just Now!
X