अभिनेता सलमान खान फिल्म्सची मिर्मिती असलेला लवयात्री या चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सलमानचा मेहुणा आयुष शर्मा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटासाठी आयुष प्रचंड मेहनत करत असून नुकताच त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान त्याला जीम ट्रेनिंग देत असल्याचं दिसून येत आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आयुष जीममध्ये घाम गाळत असून सलमान त्याला ट्रेनिंग देत आहे. आयुषदेखील सलमानची प्रत्येक गोष्ट ऐकत त्याचे रुल फॉलो करत आहे. या व्हिडिओ पाहता ही ट्रेनिंग चित्रपटासाठी सुरु असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे.विशेष म्हणजे आयुष सलमानला भाई बोलत आहे. त्यामुळे या दोघांमधील नातं किती घट्ट आहे हेदेखील यावेळी पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आयुषचा हा व्हिडिओ पाहता त्याने चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अभिराज मिनावला दिग्दर्शित या चित्रपटातून सलमान खानचा मेव्हणा आयुष शर्मा आणि अभिनेत्री वरिना हुसैन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ५ ऑक्टोबर रोजी देशभरात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सलमानसोबतच आयुष शर्मा, वरिना हुसैन, दिग्दर्शक अभिराम मिनावाला आणि इतर कलाकार राम कपूर, रोनित रॉय यांच्याविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला होता.