News Flash

‘भाई, बिना शर्ट के विंटर?’; सलमानच्या शर्टलेस फोटोवर चाहत्यांची मस्करी

हिवाळी कलेक्शनची घोषणा करताना सलमानने त्याचा शर्टलेस फोटो पोस्ट केला आहे.

सलमान खान

बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलामान खान सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून सोशन मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. नुकताच सलमानने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून त्या फोटोवरून चाहते त्याची मस्करी करत आहेत. ‘बिईंग ह्युमन’ या त्याच्या ब्रँडचे हिवाळी कलेक्शन लवकरच येणार असल्याचं त्याने सांगितलंय. विशेष म्हणजे हिवाळी कलेक्शनची घोषणा करताना सलमानने त्याचा शर्टलेस फोटो पोस्ट केला आहे.

सलमानच्या या शर्टलेस फोटोवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. ‘सर, या हिवाळ्यात शर्टच नाही घालायचा का?’, असा मजेशीर प्रश्न एका चाहत्याने विचारला आहे. तर ‘माफ कर भाईजान, मी हिवाळ्यात असा शर्टलेस नाही राहू शकत’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘भाई, बिना शर्ट के विंटर?, असं एकाने म्हटलंय. सलमानला घोडेस्वारीची प्रचंड आवड असून त्याने हा फोटोसुद्धा घोडेस्वार करताना काढला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

आणखी वाचा : हनीमूनला गेलेल्या काजलचा पतीसोबत अंडरवॉटर रोमान्स

दरम्यान, सलमान सध्या बिग बॉसच्या १४ व्या पर्वाचं सूत्रसंचालन करत असून त्याचसोबत आगामी चित्रपट ‘राधे’चं चित्रीकरणसुद्धा पूर्ण करतोय. लॉकडाउनमुळे या चित्रपटाचं शूटिंग रखडलं होतं. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, रणदीप हुड्डा, दिशा पटानी आणि प्रभु देवा यांच्याही भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 10:17 am

Web Title: salman khan goes shirtless to promote winter collection fans joke dcp 98 ssv 92
Next Stories
1 पुढच्या वर्षी होणार मिसेस… सोनाली कुलकर्णीची खास पोस्ट
2 देवासोबत होतेय सोनू सूदची पूजा; चाहत्यांचं प्रेम पाहून अभिनेता झाला भावूक
3 ‘माझ्या मुलानं भारतात काम करु नये’; सोनू निगमनं केलं वादग्रस्त वक्तव्य
Just Now!
X