News Flash

Video : ‘त्या’ भांडणानंतर सलमानने घेतली राखीची बाजू, म्हणाला…

पाहा, नेमकं काय झालं 'बिग बॉस'च्या घरात

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. यंदा या शोचं १४ वं पर्व असून पहिल्या दिवसापासून हे पर्व गाजत आहे. कधी घरातील स्पर्धकांमधील वाद तर कधी टास्क खेळण्याची पद्धत या सगळ्यामुळे हे पर्व सातत्याने चर्चेत येत आहे. सध्या या घरात राखी सावंत विरुद्ध जॅस्मीन असा वाद रंगला आहे. या वादात अभिनेता आणि बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खान याने उडी घेतली आहे. विशेष म्हणजे त्याने राखीची बाजू घेत घरातल्यांची कान उघडणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी रंगलेल्या एका टास्कदरम्यान राखी सावंत आणि जॅस्मीन यांच्यात वादाची ठिणगी पडली. इतकंच नाही तर अनेकदा घरातील सदस्य राखीला गृहित धरुन तिची खिल्ली उडवत असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता सलमान खानने राखीची बाजू घेत प्रत्येकाला खडे बोल सुनावले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)


“मुळात तुम्ही सगळे जण राखीला अनकूल समजता आणि स्वत: फार कूल आहात असं तुम्हाला वाटतं. पण तुम्हाला माहित नसेल प्रत्यक्षात सध्या तिच कूल ठरतीये. इथे मोठ मोठ्यांचा गर्व गळून पडतो. तर तुम्ही काय आहात?”, असं सलमान म्हणतो.

पाहा : बेफाम सौंदर्य! गुलाबी साडीत सईच्या घायाळ करणाऱ्या अदा

 दरम्यान, ‘बिग बॉस’मध्ये रंगलेल्या या ‘विकेंड वॉर’मध्ये सलमानने अभिनव, रुबिना, आर्शी, एजाज या स्पर्धकांचीदेखील सलमानने कान उघडणी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 12:49 pm

Web Title: salman khan got angry over house members rakhi sawant ssj 93
Next Stories
1 ‘कुली नं. १’वरुन ट्रोल करणाऱ्यांना वरुण धवनचे सडेतोड उत्तर, म्हणाला…
2 ‘टायगर जिंदा है’चा दिग्दर्शक अली अब्बास जफरने बांधली लग्नगाठ
3 नोरा फतेहीने शेअर केला नव्या वर्षातील पहिला व्हिडीओ, सोशल मीडियावर चर्चेत
Just Now!
X