14 August 2020

News Flash

‘जय जवान, जय किसान’ म्हणत सलमानने जोडलं काळ्या मातीशी नातं

सलमान करतोय फार्महाऊसमध्ये शेती

देशात लॉकडाउन सुरु झाल्यापासून अभिनेता सलमान खान त्याच्या कुटुंबीयांसोबत पनवेल येथील फार्महाऊसवर अडकला आहे. या काळात तो विविध कामांमध्ये त्याचं मन रमवतांना दिसत आहे. अलिकडेच त्याने सोशल मीडियावर शेतात काम करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये सलमानची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

सलमान बऱ्याच वेळा सोशल मीडियावर त्याचे काही व्हिडीओ, फोटो शेअर करत असतो. या लॉकडाउनच्या काळातदेखील तो इन्स्टाग्राम, ट्विट आणि फेसबुक यांच्या माध्यमातून त्याचे अपडेट्स चाहत्यांना देत आहे. यात त्याने शेतात काम करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. यात तो शेताच्या मधोमध उभा असून शेताची लावणी करताना दिसत आहे.

“दाने दाने पे लिखा होता हैं, खाने वाले का नाम. जय जवान, जय किसान”, असं कॅप्शन देत सलमानने हा फोटो शेअर केला आहे. दरम्यान, अलिकडेच सलमान फार्महाऊसवर पावसाचा आनंद घेत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. सलमानचा बॉडीगार्ड शेरा याने त्याच्या इन्स्टाग्रामवर तो फोटो शेअर केला होता. सलमान लवकरच राधे या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दिशा पटानी, रणदीप हुड्डा हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 4:34 pm

Web Title: salman khan grows crops at his farm house photo viral on internet ssj 93
Next Stories
1 ‘शक्तिमान’मधून किटू गिडवाणीला बाहेर का केलं?; मुकेश खन्नांनी सांगितली इनसाईड स्टोरी
2 फटाक्यांच्या आवाजावर जेवणाऱ्या कुत्र्याला जेव्हा नैराश्य येतं
3 हेमा मालिनी यांनी करोनाची लागण झाल्याचं वृत्त फेटाळलं; व्हिडिओ पोस्ट करुन म्हणाल्या…
Just Now!
X