15 October 2019

News Flash

…म्हणून सलमानने हिसकावला चाहत्याचा फोन

सलमान खानविरोधात मुंबईच्या डीएन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली

चाहत्याचा फोन हिसकावल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानविरोधात मुंबईच्या डीएन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र सलमानने व्हिडिओ न काढण्याचा समज दिल्यानंतरही हा चाहता त्याचे व्हिडिओ काढत होता. सांगूनही चाहत्याने व्हिडिओ करणं न थांबविल्यामुळे सलमानला हे वर्तन करावं लागल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.

बुधवारी संध्याकाळी सलमान आणि त्याचे काही अंगरक्षक जुहूच्या रस्त्यावर सायकलिंग करत होते. यावेळी सलमानला पाहून चाहते आणि काही पत्रकार सलमानचे फोटो घेण्यासाठी पुढे सरसावले. यावेळी रागाच्या भरात सलमानने फोटो काढणाऱ्या पत्रकार अशोक श्यामलाल पांडे यांचा फोन हिसकावल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. अशोक श्यामलाल पांडे इथपर्यंतच न थांबता त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र प्रत्यक्षात सलमानने हे मुद्दाम न केल्याचं समोर आलं आहे.

चाहत्यांनी सलमानचे फोटो काढण्यास सुरुवात केल्यानंतर सलमानने आणि त्याच्या अंगरक्षकांनी फोटो आणि व्हिडिओ काढू नका असं अनेक वेळा सांगितलं. मात्र त्यांचं कोणीच ऐकायला तयार नव्हतं. त्यातच सलमानच्या बाजूला एक गाडी उभी राहिली. या गाडीतून अशोक पांडे सतत सलमानचा व्हिडिओ काढत होते. अशोक पांडे यांनादेखील सलमानने व्हिडिओ न काढण्याची विनंती केली. मात्र अशोक पांडे त्याचं ऐकण्याच्या तयारीत नव्हते. त्यामुळे नाइलाजाने सलमानला त्यांचा फोन हिसकावून घ्यावा लागला. परंतु काही वेळानंतर सलमानच्या अंगरक्षकांनी अशोक पांडे यांचा फोन त्यांना परतदेखील केला, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

दरम्यान, सलमानच्या अंगरक्षकानेही या प्रकरणासंदर्भात एक तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत सलमानचा पाठलाग करण्याचा आणि विना परवानगी व्हिडिओ शूट केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

First Published on April 26, 2019 10:05 am

Web Title: salman khan had warned videographers mobile phone was returned says onlooker