News Flash

…म्हणून सनी लिओनीला सलमान सर्वात जास्त आवडतो

ती सलमानलाच पहिली भेटली होती

बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याआधी सनीने सलमानच्या 'बिग बॉस' या टेलिव्हिजन रिआलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता.

सलमान खानची क्रेझ तरुणींमध्ये किती आहे हे काही वेगळं सांगायला नको. त्याच्या प्रत्येक सिनेमानंतर त्याच्या चाहतींची संख्या दुप्पटीपेक्षा जास्तीने वाढते. सलमान जे करेल ती स्टाइल बनते आणि त्याचे चाहते ती स्टाइल फॉलो करायला सुरूवात करतात. मग ते टॉवेल घेऊन नाचणं असो किंवा पाठीमागे गॉगल लावून संवाद म्हणणं. त्याची प्रत्येक गोष्ट ही ट्रेण्ड बनली जाते. सर्व सामान्य लोकच त्याचे चाहते आहेत असं नाही तर बॉलिवूडच्या बेबी डॉललाही तो फार आवडतो. सनीने अनेक सार्वजनिक ठिकाणी सलमानचं भरभरून कौतुक केलं आहे.

नवाज, शाहरुख अडचणीत ५०० कोटींच्या घोटाळ्यात उघड झाले नाव

सलमानचं कौतुक करताना ती म्हणते की, सलमान माझ्याशी बोलताना नेहमीच आदराने आणि मैत्रीपूर्ण पद्धतीने बोलतो. त्याच्या वागण्यात विनम्रता असते, म्हणूनच तो मला सर्वात जास्त भावतो. सनी बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी सर्वात आधी कोणाला भेटली असेल तर ती व्यक्ती म्हणजे सलमान खान. ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करण्यापूर्वी ती सलमानलाच पहिली भेटली होती. या शोमधून बाहेर आल्यानंतर सनीला अनेक सिनेमांच्या ऑफर्स आल्या.

लवकरच ती आता राजीव वालिया दिग्दर्शित तेरा इंतजार या सिनेमात सलमानचा भाऊ अरबाज खानसोबत झळकणार आहे. त्यामुळे आपण सलमान आणि अरबाज या दोघांनाही जवळून पाहिले असून केवळ हे दोघेच नाही, तर संपूर्ण खान कुटुंबीयच खूप प्रेमळ आणि काळजी घेणारं असल्याचं सनीनं म्हटलंय.

Afghan First Look: गाण्यानंतर आता अभिनयासाठी अदनान सामी सज्ज

सनी सध्या अजय देवगण आणि इमरान हाश्मीच्या ‘बादशाहो’ या सिनेमामुळे सध्या खूपच चर्चेत आहे. या सिनेमाच्या एका गाण्यात ती इमरानसोबत दिसणार आहे. मोठ्या पडद्यावर या गाण्याच्या निमित्ताने इमरानसोबत सनी पहिल्यांदाच झळकणार आहे. त्यामुळेच या जोडीला एकत्र बघण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये दिसत आहे. इमरानसोबत भविष्यात एखादा सिनेमा करणार का असा प्रश्न तिला विचारला असता तिने होकारार्थी प्रतिसाद देत म्हटले की, इमरानही माणूस म्हणून तितकाच चांगला आहे. त्यामुळे तिला त्याच्यासोबत सिनेमा करायला नक्कीच आवडेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 5:03 pm

Web Title: salman khan has always been so nice to me sunny leone
Next Stories
1 अक्षयला इम्प्रेस करण्यासाठी तिने केला हा आटापिटा..
2 गोविंद निहलानी यांचा ‘ती आणि इतर’ लवकरच
3 हे सेलिब्रिटी कपल त्यांची अॅनिव्हर्सरी विसरले आणि…
Just Now!
X