News Flash

सहकलाकाराला हृदयविकाराचा झटका, सलमान घेतोय काळजी

कामात अतिशय व्यस्त असूनही सलमान वेळोवेळी त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत आहे.

सलमान खान

अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवुडमधील अनेक कलाकार त्यांच्या माणुसकी जपणाऱ्या स्वभावामुळे ओळखले जातात. यातीलच एक नाव म्हणजे सलमान खान. बॉलिवुड सुपरस्टार सलमान खानचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतातच पण, सलमान त्याच्या ‘बीइंग ह्युमन’ या संस्थेमार्फत अनेक सामाजिक कार्य सुद्धा करत असतो. सलमान कायमच त्याच्या फॅन्सना किंवा सहकाऱ्यांना योग्य वागणूक देतो. सध्या सलमान ‘दबंग 3’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे बरेचसे काम पूर्ण होत आले आहे.

नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, सलमानसोबत ‘दबंग’ आणि ‘दबंग 2’मध्ये काम करणारे सहकलाकार दद्दी पांडे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना उपचारासाठी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. सलमानला ही बातमी कळताच त्याने लगेचच त्याच्या टीममधील एका माणसाला दद्दी पांडे यांची काळजी घेण्यासाठी पाठवले. गोरेगावमधील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. लवकरच त्यांची तब्येत सुधारेल असे सांगण्यात आले आहे.

कामात अतिशय व्यस्त असूनही सलमान वेळोवेळी त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत आहे. प्रभुदेवा दिग्दर्शित सलमान खानचा ‘दबंग ३’ हा चित्रपट २० डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. सलमानचा ‘भारत’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. सलमान व कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगली कामगिरी केली. सलमानचे ‘ट्यूबलाइट’, ‘रेस ३’ हे चित्रपट फ्लॉप ठरले होते. त्यामुळे ‘भारत’च्या यशाने त्याला दिलासा मिळाला आहे. ‘दबंग 3’ कडूनदेखील सलमानला खूप आशा आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 11:59 am

Web Title: salman khan help co artist heart attack djj 97
Next Stories
1 ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’चे कलाकार १९ वर्षानंतर पुन्हा एकत्र
2 अर्जुन कपूर आणि मलायकाने न्यूयॉर्कमध्ये घेतली ऋषी कपूर यांची भेट
3 #BottleCapChallenge: सेलिब्रिटीजने एकदम स्टाइलमध्ये पूर्ण केले चॅलेंज, पाहा व्हिडिओ
Just Now!
X