03 December 2020

News Flash

छत्रपती शिवाजी महाराजांवरील मराठी चित्रपटात सलमान खान

सलमान म्हणाला, मी 'छत्रपती शिवाजी' चित्रपटामध्ये काम करत आहे.

बॉलीवूड आणि मराठी अभिनेता रितेश देशमुख हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर भव्य असा मराठी चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात बॉलीवूडचा सुलतान म्हणजेच सलमान खान काम करणार असल्याची सध्या चर्चा आहे.
रितेश देशमुखच्या ‘छत्रपती शिवाजी’ या चित्रपटामध्ये सलमान खान दिसणार आहे. अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवत असून, सलमान खानची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका असू शकते. सुलतानच्या यशानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत स्वत: सलमानने ही माहिती दिली. सलमानने यापूर्वी रितेशच्या लय भारी चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर आपल्या आणखी एका मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याचे सलमानने रितेशला सांगितलेले. पत्रकार परिषदेत याविषयी सलमान म्हणाला की, मी ‘छत्रपती शिवाजी’ चित्रपटामध्ये काम करत आहे. या चित्रपटात माझे पाच ते सहा दिवसांचे काम आहे. रितेश देशमुख या चित्रपटाची निर्मिती करत असून, मला चांगली भूमिका मिळाली आहे असे सलमानने सांगितले.  याचा अर्थ लय भारी प्रमाणे सलमान आता पाहुण्या कलाकाराच्या नाही तर चांगल्या दमदार भूमिकेतचं दिसेल. रितेश आणि जेनेलिया देशमुखच्या मुंबई फिल्म कंपनी अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होणार आहेत.
दिग्दर्शक रवी जाधव हा ‘छत्रपती शिवाजी’  या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. सध्या रवी जाधव आणि रितेश देशमुख हे बॅण्जो या चित्रपटावर काम करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 3:44 pm

Web Title: salman khan in riteish deshmukhs upcoming movie on shivaji maharaj
Next Stories
1 अमेरिकेत दोन तासात ‘कबाली’च्या तिकीटांची विक्री
2 ‘हॅमिल्टन’ एक सांगीतिक वादळ!
3 मुलांच्या भावविश्वाचे ‘हाफ तिकीट’!
Just Now!
X