27 February 2021

News Flash

‘भारत’च्या चित्रीकरणादरम्यान सलमान जखमी

'भारत'च्या चित्रीकरणासाठी वाघा बॉर्डरसारखा सेट उभारण्यात आला आहे.

सलमान खान

अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ठरत असलेला ‘भारत’ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसापासून चर्चा रंगली आहे. नुकताच या चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित झालं असून चित्रपटाची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या पुढील टप्प्याचं चित्रीकरण सुरु असताना बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान जखमी झाल्याचं समोर आलं आहे.

सलमान खानचा चित्रपट म्हटलं की त्यात साहसदृश्य ही आलीच. अशाच काही साहसदृश्यांचा समावेश ‘भारत’ या चित्रपटामध्ये देखील करण्यात आला आहे. या साहसदृश्यांची तयारी करत असताना सलमान खान जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मुंबईला रवाना करण्यात आलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, साहसदृश करतांना फिट राहण्यासाठी सलमान जीममध्ये वर्कआऊट करत होता. यावेळी त्याला दुखापत झाली असून फॅक्चर झाल्याचं सांगण्यात येत आहे. या दुखापतीनंतर डॉक्टरांनी त्याला सक्तीचा आराम करण्यास सांगितला आहे. त्यामुळे ‘भारत’चं चित्रीकरण अर्ध्यावर सोडून त्याला मुंबईमध्ये परतावं लागलं आहे.

दरम्यान, ‘भारत’चं चित्रीकरण सध्या पंजाबमधील लुधियानापासून २० किमी लांब बल्लोवाला गाव येथे सुरु असून तेथे वाघा बॉर्डरसारखा सेट उभारण्यात आला आहे. मात्र सलमान मुंबईत परतल्यामुळे चित्रपटाचं चित्रीकरण मध्येच खोळंबल्याचं पाहायला मिळत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2018 1:05 pm

Web Title: salman khan injured in bharat film sets
Next Stories
1 ‘बडे अच्छे लगते है’ फेम अभिनेत्रीचा पतीवर लैंगिक शोषणाचा आरोप
2 बॉक्स ऑफीसवर ‘आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाची गाडी सुसाट
3 Video : विठूमाऊलीचा महिमा सांगणारं ‘माझी पंढरीची माय’ प्रदर्शित
Just Now!
X