News Flash

भाच्याच्या संगोपनाची सलमानला काळजी, मदतनीसांच्या घेतल्या मुलाखती

भाचा अहिलच्या देखभालीसाठी मदतनीसाची नेमणूक करण्यासाठी सलमानचा पुढाकार

Khan family wanted the best person to be the nanny for Arpita’s son Ahil. Interviews were conducted and Salman Khan himself reviewed some applicants.” (Source: Twitter)

एरवी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त असणारा सलमान खान ५ एप्रिलला एका वेगळ्याच कारणासाठी व्यस्त होता. मंगळवारची सायंकाळ सलमानने मदतनीसांच्या मुलाखती घेण्यात व्यतीत केली. सलमान काही दिवसांपूर्वी मामा झाला. भाचा अहिलच्या देखभालीसाठी मदतनीसाची नेमणूक करण्यासाठी सलमानने पुढाकार घेऊन तब्बल २५ मदतनीसांची मुलाखत घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली. सलमानसह त्याचे संपूर्ण कुटुंब देखील उपस्थित होते. मुंबईतील वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये हा मुलाखतीचा कार्यक्रम झाला.
सलमानची बहिण अर्पिता हिने गेल्या आठवड्यात बुधवारी सकाळी मुंबईतील हिंदुजा हेल्थकेअर रुग्णालयात बाळाला जन्म दिला. सलमानचा मेहुणा म्हणजेच अर्पिताचा पती आयुष शर्माने ही गोड बातमी समाजमाध्यमांमध्ये शेअर केली होती. दरम्यान, बाळाचे नाव ‘अहिल’ ठेवण्यात आल्याचेही आयुषने सांगितले होते. अहिल आणि अर्पिता रुग्णालयातून घरी परतल्यानंतर खान कुटुंबियांनी बाळाच्या देखभालीसाठी योग्य मदतनीसेची नेमणुक करण्यासाठी मुलाखती घ्यायच्या ठरवल्या. त्यानुसार मंगळवारी दुपारी पाच ते रात्री ९ या वेळेत पंचवीसएक मदतनीसांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यातून एकीची निवड देखील करण्यात आल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 6:24 pm

Web Title: salman khan interviews nannies for nephew ahil
टॅग : Salman Khan
Next Stories
1 कान चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्रातून रिंगण, हलाल आणि वक्रतुंड महाकाय
2 ‘नोटीस मागे घे नाहीतर..’, कंगनाचा हृतिकला निर्वाणीचा इशारा
3 ‘सरबजीत’चे नवे पोस्टर प्रसिद्ध
Just Now!
X