News Flash

Bigg Boss Marathi 2: विकेंडच्या डावात भाईजानमुळे येणार वेगळीच जान

कलर्स मराठीने फेसबूकपोस्टद्वारे ही माहिती दिली आहे

वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस. बिग बॉस मराठीचे पर्व दुसरे सुरु होऊन ७० दिवसांहून अधिक दिवस उलटले आहेत. आता सर्व स्पर्धकांनी आपापल्या परिने गेम खेळण्यास सुरुवात केली आहे. या शोच्या सूत्रसंचालनची धूरा अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

घरातील स्पर्धकांवर बिग बॉसची नजर असते. त्यामुळेच या सदस्यांचे घरातील वागणे पाहून शनिवार आणि रविवारी रंगणाऱ्या विकेंडच्या डावामध्ये महेश मांजरेकर त्यांची कानउघडणी करतात. आता स्पर्धकांची कान उघडणी करण्यासाठी हिंदी बिग बॉसचा सूत्रसंचालक, बॉलिवूडचा भाईजान सलमान खान येणार आहे. सलमान महेश मांजरेकरांसोबत घरातल्या स्पर्धकांची कान उघडणी करणार आहे. विकेंडच्या डावामध्ये सलमान खानचे येणे सर्वांसाठी सुखद धक्काच आहे.

कलर्स मराठीने काल त्यांच्या फेसबूक पेजवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ‘कोण येणारे तुम्हाला भेटायला #WeekendChaDaav मध्ये? कमेंट करा’ असे लिहिले होते. त्यावरुन रिसिकप्रेक्षकांनी अनेक निष्कर्ष लावले होते. शेवटी कलर्स मराठीने “#BiggBossMarathi2 च्या घरात येणार जान, जेव्हा #WeekendChaDaav मध्ये येणार ‘भाईजान’…” असे लिहिले आहे.

हिंदी बिग बॉस प्रमाणेच मराठी बिग बॉसमध्ये देखील सलमान स्पर्धकांची शाळा घेणार की स्पर्धकांना सल्ले देणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. लवकरच हिंदी बिग बॉस १३ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचे सूत्रसंचालन सलमान खान करणार आहे. तसेच या पर्वामध्ये मुग्धा गोडसे, माहिका शर्मा, सिद्धार्थ शुक्ला, चंकी पांडे, देवोलिना भट्टाचार्जी, राजपाल यादव आणि आदित्य नारायण हे स्पर्धक सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2019 11:04 am

Web Title: salman khan is coming in bigg boss marathi house avb 95
Next Stories
1 दिशा पटानीच्या योग्यतेचा मी नाही – टायगर श्रॉफ
2 मुलगी आणि कुटुंबीयांना धमकी, अनुराग कश्यपने डिअॅक्टीवेट केलं ट्विटर अकाऊंट
3 रंगभूमी नाटककाराचीच!
Just Now!
X