27 September 2020

News Flash

सलमान-अहिलची ‘सॉलिड टीम’..

सलमानच्या आगामी 'ट्युबलाइट' या चित्रपटाचे चित्रिकरण नुकतेच पूर्ण झाले आहे

छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रिकरण संपवून काही वेळ स्वत:साठी देत आहे. कबीर खानच्या ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाच्या चित्रपटाच्या चित्रिकरणानंतर कामाच्या व्यापातून मुक्त होत सलमान त्याच्या भाच्यासोबत धम्माल करत आहे. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या सलमानच्या बहिणीने म्हणजेच अर्पिता खान शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन मामूजान सलमानसोबत अहिलचे काही सुरेख फोटो शेअर केले आहेत.

View this post on Instagram

❤️ @beingsalmankhan

A post shared by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on

View this post on Instagram

Priceless moments ! Family first @beingsalmankhan

A post shared by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on

या फोटोंमध्ये सलमान आणि अहिल एकमेकांची कंपनी एन्जॉय करताना दिसत आहेत. अहिल आणि सलमान खान यांचे सुरेख नाते सर्वांनाच ठाऊक आहे. काही दिवसांपूर्वीच अहिलने बिग बॉसच्या सेटवरही हजेरी लावली होती. अहिल सेटवर आल्याचे कळताच सलमानने चित्रिकरणातून वेळ काढत अहिलसोबत मज्जा मस्ती करण्यास प्राधान्य दिले होते. यावेळी काढलेले सलमान आणि अहिलचे फोटो सोशल मीडियावरही चांगलेच चर्चेत आले होते. या फोटोंमध्ये सलमानने अहिलला उचलले असून त्या दोघांच्याही चेहऱ्यावर सुरेख असे स्मित खुलल्याचे पाहायला मिळाले. सलमानने अहिलला यावेळी बिग बॉसच्या मंचावरही नेले आणि त्याला मिश्किलपणे विचारले की, ‘तू माझ्यासोबत या शोचे सूत्रसंचालन करणार आहेस का?’. इतक्यावरच न थांबता त्याने अहिलच्या हाती माइक देत त्याला एक ओळही बोलून दाखवली. जी ओळ सलमान नेहमीच या शोच्या सुरुवातीला म्हणतो. पण, ‘मामूजान’ सलमानप्रमाणे सूत्रसंचालन करण्यापेक्षा अहिलने त्या माइकसोबत खेळण्यालाच प्राधान्य दिले होते.

दरम्यान, भाईजान सलमान लवकरच ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अभिनेता सलमान खानसोबतच चीनी अभिनेत्री झू झू सुद्धा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यासोबतच अभिनेता सोहेल खान आणि बॉलिवूडचा किंग शाहरुख खान यांच्यासुद्धा या चित्रपटामध्ये भूमिका असणार आहेत. या चित्रपटाबद्दल सध्या सर्वांमध्येच उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 2:24 pm

Web Title: salman khan is de stressing himself with ahil and the mama bhanja moment is just priceless see pics
Next Stories
1 VIDEO: शाहरुखच्या लेकीचा हा स्टेज परफॉर्मन्स पाहिलात का?
2 ‘द सेकंड सेक्स’ म्हणजे स्त्रीवादाचं बायबल- वीणा जामकर
3 VIDEO: मालिकेच्या आगळ्यावेगळ्या प्रमोशनमुळे अभिनेत्री श्रुती उल्फतला अटक
Just Now!
X