19 January 2020

News Flash

जाणून घ्या, ‘बिग बॉस’च्या १३व्या पर्वाचे कोण करणार सूत्रसंचालन ?

आतापर्यंत सलमान खानने बिग बॉसचे प्रत्येक पर्व गाजवले आहे.पुढील पर्वाचं सूत्रसंचालन सलमानच करणार की नाही ही उत्सुकता कायमच प्रेक्षकांमध्ये असते

बिग बॉस

बिग बॉस हा टिव्ही शो प्रेक्षकांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे.आतापर्यंत सलमान खानने बिग बॉसचे प्रत्येक पर्व गाजवले आहे.पुढील पर्वात सलमानच सूत्रसंचालन करणार की नाही ही उत्सुकता कायमच प्रेक्षकांमध्ये असते. प्रत्येक सिझनच्या शेवटी सलमान प्रेक्षकांना पुढील पर्वाच्या सूत्रसंचालकाची काहीच कल्पना देत नाही. बिग बॉसचे तेरावे पर्व लवकरच येणार असून यावेळेस सूत्रसंचालक कोण असेल याबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच तेराव्या सिझनचे सूत्रसंचालन करणार आहे हे आता नक्की झाले आहे.

सलमान खान कदाचित या पर्वाचे सूत्रसंचालन करणार नाही अशा चर्चा होत्या पण,पिंकव्हीला वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार बिग बॉसच्या ह्या पर्वाचे सूत्रसंचालन तोच करणार आहे.या पर्वाचे वेगळेपण म्हणजे या पर्वात सामान्य स्पर्धकांना प्रवेश दिला जाणार नाही.बिग बॉसचे मागचे पर्व विशेष गाजले नव्हते. कदाचित याच कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला असावा.सलमान खानला बिग बॉसच्या स्वरूपाबद्दल विचारले असता तो म्हणाला की, ‘कधीतरी मी या कार्यक्रमाची मजा घेतो कधीकधी नाही. पण,या स्पर्धकांकडून मी खूप काही शिकतोय.’

बिग बॉसच्या निर्मात्यांनी आतापर्यंत जय भानुशाली, माही वीज, विवेक दहिया, नवज्योत गुरुदत्त, रीना द्विवेदी यांना स्पर्धक म्हणून विचारले आहे.बिग बॉसच्या आतापर्यंतच्या सगळ्या पर्वांचे शूटिंग लोणावळ्यामध्ये झाले होते पण यंदा या पर्वाचे शूटिंग मुंबईत होणार असल्याचे समजत आहे.

First Published on May 22, 2019 2:47 pm

Web Title: salman khan is hosting big boss 13
Next Stories
1 सलमान म्हणतो, या दिवशी करेन लग्नाची घोषणा
2 ‘…अन् माझं ते स्वप्न साकार झालं’, सुबोध भावेचं भावनिक ट्विट
3 सलमान प्रियांकासह काम करणार पण ‘या’ अटीवर
Just Now!
X