13 July 2020

News Flash

सलमान माझ्या मुलाला ब्रेक देतोय ही तर अफवा – भाग्यश्री

भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यूला सलमान खान बॉलिवूडमध्ये पहिली संधी देणार असल्याची चर्चा होती

सलमान खानने सूरज पांचोलीला बॉलिवूडमध्ये पहिली संधी मिळवून दिली. हा विषय एवढ्यापुरताच मर्यादित ठेवा, असे भाग्यश्रीने सांगितले.

‘मैने प्यार किया’तील अभिनयामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री भाग्यश्री पुन्हा एकदा तिच्या मुलाच्या बॉलिवूडमधील पदार्पणावरून चर्चेत आहे. भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यूला सलमान खान बॉलिवूडमध्ये पहिली संधी देणार असल्याची चर्चा आहे. मात्र, खुद्द भाग्यश्रीने ही अफवा असल्याचे सांगत ही माहिती तुम्हाला कोणी दिली, असा प्रश्न पत्रकारांनाच विचारला.
आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज याला सलमान खाननेच बॉलिवूडमध्ये पहिला ‘ब्रेक’ मिळवून दिला. त्यामुळे आता सलमान खानच्या निर्मितीमधील पुढील चित्रपटात अभिमन्यूला संधी दिली जाणार असल्याची चर्चा होती. पण भाग्यश्रीने हा विषय स्पष्टपणे फेटाळला. सलमान खानने सूरज पांचोलीला बॉलिवूडमध्ये पहिली संधी मिळवून दिली. हा विषय एवढ्यापुरताच मर्यादित ठेवा, असे तिने सांगितले.
आपला मुलगा अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेत असल्याचेही तिने सांगितले. सध्या तो प्रशिक्षण घेतो आहे. मात्र, अजून त्याने कोणत्याही दिग्दर्शक किंवा निर्मात्याला भेटण्यास सुरुवात केलेली नाही. लवकरच तो बॉलिवूडमधील लोकांना भेटणार आहे, असे भाग्यश्री म्हणाली.
दिग्दर्शक सूरज बडजात्या आणि सलमान खानच्या आगामी ‘प्रेम रतन धन पायो’कडून आपल्याला अनेक अपेक्षा आहेत, असेही तिने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2015 4:18 pm

Web Title: salman khan is not launching my son yet says maine pyar kiya co star bhagyashree
टॅग Salman Khan
Next Stories
1 ‘प्रेम’ळ सलमान आणि सोनमची नृत्य अदाकारी, पाहा ‘प्रेम रतन धन पायो’चे ‘टायटल साँग’
2 अंबरनाथकरांनीच मला घडवले
3 मृत मुलाच्या दर्शनाने स्टॅलोन अस्वस्थ, हरिद्वारमध्ये केले श्राद्ध
Just Now!
X