News Flash

Salman khan Nephew: ‘सलमान माझ्या मुलाला बिघडवतोय’

अर्पिता खान तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बरीच सक्रिय असते.

छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

अभिनेता सलमान खान आणि त्याच्या भाच्यामध्ये असणारे अनोखे मामा-भाच्याचे नाते आपण सारे जाणतोच. समानची बहिण अर्पिता खान तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बरीच सक्रिय असते. तिने नुकतेच पोस्ट केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहेत. अर्पिताने तिच्या मुलाचे म्हणजेच अहिलचे फोटो पोस्ट करत त्याखाली लिहिलेलं कॅप्शन वाचून तुम्हालाही आश्चर्यच वाटेल.

अर्पिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये अहिल मामू सलमान खानच्या लकी ब्रेसलेटसोबत खेळताना दिसत आहे. अहिल ते ब्रेसलेट खेळण्यापेक्षा जास्त चघळतानाच दिसत आहे. सलमानच्या चाहत्यांप्रमाणेच कदाचित त्यालाही या ब्रेसलेटने भुरळ पाडली असावी. अर्पिताने अहिलचे ब्रेसलेटसोबत खेळतानाचे काही फोटो पोस्ट करत त्यात स्पष्ट केले आहे, की त्यावेळी ती अहिलच्या आजूबाजूला नव्हती. तिच्या गैरहजेरीतच मामू सलमान भाच्याला अशा प्रकारे बिघडवत आहे असेही अर्पिताने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. अर्पिताने पोस्ट केलेल्या या फोटोंमुळे हा रविवार तिच्यासाठी खास होता हेसुद्धा स्पष्ट होत आहे.

दरम्यान, भाच्यासाठी वेळात वेळ काढणारा अभिनेता सलमान खान त्याच्या ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरु असून चित्रपटाचा बराचसा भाग चित्रीत झाला आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटामध्ये १९६२ मध्ये भारत आणि चीन दरम्यान झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरील कथानक साकारलेले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 10:07 am

Web Title: salman khan is spoiling nephew ahil and arpita khan sharma has proof see pics
टॅग : Salman Khan
Next Stories
1 ..म्हणून चाहत्यांपासून दूर जाणार रणबीर कपूर
2 BLOG : यश नेमके कशात? आठवड्यात, गल्ल्यात की प्रभावात?
3 सेलिब्रिटी क्रश: ‘त्या’ प्रेमपत्राचे उत्तर आलेच नाही
Just Now!
X