News Flash

‘मला सलमान खानसारखा प्रियकर हवा होता’

लहानपणी ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट पाहिल्यानंतर सलमान खान मला आवडायला लागला होता. मला त्याच्यासारखाच प्रियकर हवा होता. त्यामुळे जेव्हा  मला ‘प्रेम रतन धन पायो’मध्ये

सलमानबरोबर काम करण्याची भावनाच आनंददायी होती आणि चित्रपटाच्या सेटवर त्याला प्रत्यक्ष भेटण्याचा अनुभव त्यापेक्षाही आनंददायी असल्याचे समायराने सांगितले

लहानपणी ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट पाहिल्यानंतर सलमान खान मला आवडायला लागला होता. मला त्याच्यासारखाच प्रियकर हवा होता. त्यामुळे जेव्हा  मला ‘प्रेम रतन धन पायो’मध्ये सलमान खानच्या असिस्टंटची भूमिका करायची आहे, हे मला सांगण्यात आले तेव्हा पहिल्यांदा माझा विश्वासच बसला नाही, असे समायरा राव हिने सांगितले. ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटातून समायरा बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.  सलमानबरोबर काम करण्याची भावनाच आनंददायी होती आणि चित्रपटाच्या सेटवर त्याला प्रत्यक्ष भेटण्याचा अनुभव त्यापेक्षाही आनंददायी असल्याचे समायराने सांगितले.
सुरूवातीला चित्रपटाच्या सेटवर सलमानने माझ्याकडे पाहिले आणि मान हलवली. मात्र, त्यावेळी मी काहीच बोलण्याची हिंमत करू शकले नाही. त्यानंतर सुरज सर मला सलमानकडे घेऊन गेले आणि ही तुझ्या असिस्टंटची भूमिका करणार असल्याचे त्यांनी सलमानला सांगितले. तेव्हा सलमान तुम्हाला भेटून चांगले वाटले, असे म्हणाला. त्या क्षणाला मी आनंदाच्या शिखरावर होते, असे समायराने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले. ‘प्रेम रतन धन पायो’च्या चित्रीकरणादरम्यान मला सलमान खानचा निस्वार्थीपणा सगळ्यात जास्त भावला. त्याच्यासोबत काम करताना माझ्यावर कधीही दडपण आले नाही. तुम्ही नवीन असाल तरी सलमान खान तुमच्या कामात सहजता आणाण्यासाठी मदत करतो. इतका मोठा स्टार असूनही तो निस्वार्थी आहे, तो सर्वप्रथम त्याच्या सहकालाकाराचा विचार करतो. त्याला कोणत्याहीप्रकारची असुरक्षितता वाटत नाही, असे समायराने सांगितले. सलमान खानबरोबर काम करायला मिळाल्यामुळे माझे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. ‘प्रेम रतन धन पायो’मधील माझे काम प्रेक्षकांना नक्की आवडेल, अशी आशा मला असल्याचेही यावेळी समायराने म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2015 1:37 pm

Web Title: salman khan is the most selfless superstar prem ratan dhan payo debutante samaira rao
टॅग : Bollywood,Salman Khan
Next Stories
1 ‘लंडनच्या आजीबाई’ रंगभूमीवर!
2 मुंबईत खारदांडा येथे नाटय़ोत्सव रंगणार
3 विराटसोबतच्या विवाहाच्या केवळ अफवा- अनुष्का