01 December 2020

News Flash

सलमानच्या ड्रायव्हरला करोनाची लागण

सलमानने स्वत:ला आयसोलेट केलं आहे

अभिनेता सलमान खानच्या कारचालकाला करोनाची लागण झाली आहे. त्याच्यासोबतच सलमानच्या घरातील अन्य दोन स्टाफ मेंबरदेखील करोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे.  या कर्मचाऱ्यांना मुंबईतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तसंच पुढील १४ दिवस सलमान आणि त्याचे कुटुंबीय आयसोलेटमध्ये राहणार आहेत.

‘पिंकव्हिला’नुसार, सलमानच्या कारचालकाला करोनाची लागण झाल्याचं समजताच त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक स्टाफ मेंबरची करोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर घरातील अन्य दोन स्टाफ मेंबरला करोना झाल्याचं समोर आलं. त्यानंतर सलमान सध्या आयसोलेट झाला आहे.

दरम्यान, सलमान सध्या बिग बॉस १४ चं सूत्रसंचालन करत असून दुसरीकडे त्याच्या आगामी ‘राधे’ चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे. लॉकडाउनच्या काळात त्याच्या काही चित्रपटांचं चित्रीकरण रखडलं होतं. मात्र, आता पुन्हा या चित्रपटांचं चित्रीकरण सुरु झालं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 8:26 am

Web Title: salman khan isolates himself after his personal driver two staffers tested covid 19 positive ssj 93
Next Stories
1 ‘मी केबीसीमध्ये पोहोचले’, जुही चावलाचे ट्विट व्हायरल
2 VIDEO: ‘करोना अद्याप गेलेला नाही’; अभिनेत्री शिकवतेय मास्क वापरण्याची योग्य पद्धत
3 सोनू सूदने स्वीकारलं चाहतीच्या लग्नाचं आमंत्रण; पोस्ट शेअर करत म्हणाला…
Just Now!
X