29 September 2020

News Flash

“माझ्या ‘किरण’वर बनवला चित्रपट”; सलमाननं शाहरुखवर केला आरोप

सलमानचा शाहरुखवर आरोप

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि सुपरस्टार शाहरुख खान यांच्या मैत्रीचे किस्से जगजाहीर आहेत. दोघेही संधी मिळेल तेव्हा एकमेकांची खिल्ली उडवताना दिसतात. असाच एक गंमतीशीर प्रसंग बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये घडला. “शाहरुखने माझी परवानगी न घेता माझ्या क्रशचे नाव चोरले” असा गंमतीशीर आरोप सलमानने बॉलिवूडच्या बादशाहवर केला आहे.

Irrfan Khan: टायर विकणाऱ्याचा मुलगा आज आहे बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता

बिग बॉस या रिअॅलिटी शोचा विकेंडचा भाग नेहमीच चर्चेत असतो. आठवड्याच्या शेवटी प्रदर्शित होणाऱ्या या भागात सलमान खान स्वत: बिग बॉसमधील सर्व स्पर्धकांशी बातचित करतो. यावेळी अनेक वादविवाद घडतात. परंतु यावेळचा विकेंडचा डाव गाजला तो सलमानने शाहरुखवर केलेल्या त्या आरोपामुळे.

AR Rahman: ऑस्कर पटकावणारा भारतातील एकमेव संगीतकार

१९९३ साली प्रदर्शित झालेल्या ‘डर’ या चित्रपटात शाहरुख खान आणि अभिनेत्री जुही चावला यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटात जुहीने साकारलेल्या व्यक्तिरेखेचे नाव किरण असे होते. हे नाव दिग्दर्शक यश चोप्रा यांना शाहरुखनेच सुचवले होते. कारण सलमानच्या क्रशचे नाव किरण असे होते. सलमानला किरण नावाची एक मुलगी खूप आवडायची. परंतु तिला प्रपोज करण्याची हिंमत त्याला कधी झालीच नाही. ही माहिती शाहरुखला कुठूनतरी मिळाली होती. त्यामुळे शाहरुखने तिच्या नावावरुन सलमानला चिडवण्यास सुरुवात केली. तसेच सलमानला खिजवण्यासाठी चित्रपटात जुहीचे नाव किरण असे ठेवले. असा गंमतीशीर आरोप त्याने शाहरुखवर केला. या आरोपानंतर प्रेक्षकांनी एकच हास्यकल्लोळ केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2020 1:00 pm

Web Title: salman khan jokes shah rukh khan made a film his crush kiran mppg 94
Next Stories
1 ..म्हणून शाहरुख, आमिर आणि मी कधीच एकत्र काम करू शकणार नाही- सलमान खान
2 भर रस्त्यात रितेशला घालाव्या लागल्या टायगर श्रॉफला बेड्या
3 चहलच्या घरी लवकरच वाजणार सनई-चौघडे?
Just Now!
X