03 August 2020

News Flash

सलमान-कतरिना पुन्हा एकत्र, घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानांची भेट

बांगलादेशमध्ये सध्या 'बांगलादेश प्रीमियर लीग' खेळली जात आहे.

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ सध्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेह हसीना यांच्यामुळेच चर्चेत आहेत. दोघांनी अलिकडेच पंतप्रधान शेख हसिना यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सलमानने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

जेव्हा जेव्हा शाहिद तो चित्रपट पाहायचा तेव्हा त्याला कोसळायचे रडू

बांगलादेशमध्ये सध्या ‘बांगलादेश प्रीमियर लीग’ खेळली जात आहे. क्रिकेट लीगच्या निमित्ताने एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या निमित्ताने सलमान-कतरिना यांनी शेख हसिना यांची भेट घेतली. त्यानंतर ट्विटच्या माध्यमातून “अशा सुंदर स्त्रीची भेट घेणं हा माझा सन्मान होता.” अशा शब्दात सलमानने बांगलादेशच्या पंतप्रधानांचे कौतुक केले.

शाहरुखचे चित्रपट पाहून अभिनय शिकणारा झाला देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेता

सलमान खान सध्या ‘दबंग-३’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ‘दबंग – ३’ हा दबंग मालिकेतला अनुक्रमे तीसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या दोनही चित्रपटांनी बॉक्सऑफीसवर कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. तसेच या चित्रपटांमध्ये सोनाक्षी सिन्हा हीने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. ‘दबंग – ३’ मध्ये सोनाक्षीच मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या शिवाय मराठी सुपरस्टार महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर ही देखील या चित्रपटामध्ये अभिनय करताना दिसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2019 2:56 pm

Web Title: salman khan katrina kaif meet bangladesh pm sheikh hasina mppg 94
Next Stories
1 मराठीतील ‘या’ लोकप्रिय अभिनेत्यावर आली फुलं विकण्याची वेळ
2 तेव्हा मला आत्महत्या करावीशी वाटत होती- नेहा कक्कर
3 #Chhapaak : ..अन् दीपिका ढसाढसा रडली
Just Now!
X