22 October 2020

News Flash

सलमानच्या ‘भारत’ची घोडदौड सुरूच; पाच दिवसांत कमावले इतके कोटी रुपये

बॉक्स ऑफीसवर 'भारत'ची पकड कायम

'भारत'

अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’ या चित्रपटाची बॉक्स ऑफीसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. पाच दिवसांत या चित्रपटाने तब्बल १५०.१० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ईदच्या मुहूर्तावर हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रदर्शनाच्या दिवशीच सलमानच्या या चित्रपटाने कमाईचा विक्रम रचला. या वर्षात प्रदर्शनाच्या दिवशी बंपर ओपनिंग करणारा चित्रपट ‘भारत’ ठरला.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार ‘भारत’ देशभरातील ४७०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. ‘भारत’ने बॉक्स ऑफिसवरील पकड कायम ठेवत तिसऱ्या दिवशी १०० कोटी रुपयांकडे यशस्वी वाटचाल केली होती. सलमानचे या आधी प्रदर्शित झालेले ‘ट्युबलाइट’, ‘रेस ३’ हे चित्रपट फ्लॉप ठरले होते. त्या तुलनेत ‘भारत’च्या कमाईमुळे सलमानला दिलासा मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही.

१९४७ सालच्या फ्लॅशबॅकमध्ये रंगविण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये भारताचं होणारं विभाजन, त्या काळातील जनतेची परिस्थिती आणि साऱ्यामध्ये भारतचं खुलणारं प्रेम आणि त्याच्या जीवनाशी सुरु असलेला संघर्ष रंगविण्यात आला आहे. यामध्ये रोमान्स, कॉमेडी, ड्रामा, अॅक्शन या सगळ्यांचा भरणा आहे. ‘भारत’ हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” या दक्षिण कोरियन चित्रपटावर आधारलेला आहे. यामध्ये दिशा पटानी, नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहेत.

‘भारत’ची आतापर्यंतची कमाई-
बुधवार- ४२.३० कोटी रुपये
गुरुवार- ३१ कोटी रुपये
शुक्रवार- २२.२० कोटी रुपये
शनिवार- २६.७० कोटी रुपये
रविवार- २७.९० कोटी रुपये
एकूण- १५०.१० कोटी रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 12:35 pm

Web Title: salman khan katrina kaif starrer bharat crossed 150 cr in five days ssv 92
Next Stories
1 आईने ८२ व्या वर्षी लिहिलेल्या कहाणीमुळे कर्नाड यांना मोठ्या भावाविषयी समजले हे सत्य
2 ‘ए गिरीश! मी तुझी किती स्तुती करतेय..’ नकळत विजया मेहतांच्याही तोंडून निघाले होते हे उद्गार
3 जाणून घ्या, कर्नाड यांचा पहिला चित्रपट, वाद आणि चित्रपटासाठी झालेला खर्च
Just Now!
X