12 December 2018

News Flash

युट्यूबवर सलमान- कतरिनाच्या ‘स्वॅग’चाच बोलबाला

नेटकऱ्यांनाही भावला सलमान- कतरिनाचा 'स्वॅग'

सलमान खान, कतरिना कैफ

एकीकडे सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर कमाईचे रेकॉर्ड्स मोडत असताना त्यातील ‘स्वॅग से स्वागत’ या गाण्यानेही तरुणाईला वेड लावले आहे. युट्यूबवर या गाण्याने २०० मिलियन म्हणजेच २० कोटींहून अधिक व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. अत्यंत कमी वेळात इतक्या व्ह्यूजचा आकडा गाठणारे हे बॉलिवूडचे पहिले गाणे ठरले आहे.

इतकेच नाही तर जगभरातील टॉप ५० युट्यूबच्या यादीत जलदगतीने २० कोटी व्ह्यूज मिळवणाऱ्यांमध्ये या गाण्याचा समावेश झाला आहे. ५० दिवसांच्या आत या गाण्याने हा रेकॉर्ड केला आहे. फक्त व्ह्यूज नाहीत तर लाइक्सच्या बाबतीतही हे गाणे नंबर वन ठरले आहे. कमी वेळात १ मिलियन म्हणजेच १० लाख लाइक्स या गाण्याला मिळाले होते. १५ डिसेंबरलाच हा टप्पा गाठला होता.

वाचा : गुजरात आणि मध्यप्रदेशातही ‘पद्मावत’वर बंदी

इर्शाद कामिलने या गाण्याला लिहिले असून विशाल- शेखरने त्याला संगीतबद्ध केले आहे. याशिवाय वैभवी मर्चंटने केलेल्या कोरिओग्राफीची अनेकांकडून प्रशंसा होत आहे. त्यातील ‘सिग्नेचर स्टेप’चीसुद्धा क्रेझ तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे. ग्रीकमध्ये शूट झालेल्या या गाण्याला सलमान आणि कतरिनाच्या चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

First Published on January 12, 2018 7:05 pm

Web Title: salman khan katrina kaif starrer bollywood movie tiger zinda hai swag se swagat fastest bollywood 200 million plus views on youtube