बॉलिवूड स्टार सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ हा सिनेमा येत्या २२ तारखेला प्रदर्शित होत आहे. सलमानच्या चाहत्यांमध्ये या सिनेमाची इतकी उत्सुकता आहे की सिनेमाच्या तिकिटांचे अॅडव्हान्स तिकीट बुकींग सुरू झाले आहे. सिनेमाच्या बजेटबद्दल बोलायचे झाले तर सलमानचे मानधन वगळून हा संपूर्ण सिनेमा १४० कोटीहून अधिक रुपयांमध्ये तयार करण्यात आला आहे. तिकिटांच्या माध्यमातूनच जास्तीत जास्त पैसे कमवण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

बॉलिवूड लाइफ या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी दिल्लीतील मल्टिप्लेक्समध्ये टायगर जिंदा है सिनेमाच्या तिकिटांच्या किमती सुमारे २००० ते २४०० रुपयांपर्यंत असणार आहेत. तर मुंबईत संध्याकाळच्या तिकिटांचे तर १२०० ते १६०० रुपयांपर्यंत असतील. सिंगल स्क्रिन थिएटर्समध्ये सिनेमाच्या तिकिटांचे दर ३०० ते ४०० रुपये असतील.

तुम्हीही जर सलमान खानचे कट्टर चाहते असाल आणि तुम्हाला सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायचा असेल तर तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमधील तिकिटांचे दर नक्कीच जाणून घ्या. पण देशभरात सलमानचे कट्टर चाहते काही कमी नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठी २४०० रुपयांचे तिकिट फारसे महाग नसेल. कबीर खान दिग्दर्शित ‘टायगर जिंदा है’ हा सिनेमा एक था टायगरचा पुढील भाग असणार आहे. ‘एक था टायगर’ची कथा जिथे संपली तिथून ‘टायगर जिंदा है’ची कथा सुरू होणार आहे. या सिनेमात सलमानसोबत कतरिना कैफचीही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.