19 March 2019

News Flash

Video : आयुष- वरिनाच्या ‘लव्हरात्री’चा टीझर पाहिलात का?

बॉलिवूडमध्ये स्वत:ती वेगळी ओळख प्रस्थापित करण्यासाठी सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा सज्ज झाला आहे.

'लव्हरात्री'

बॉलिवूडमध्ये स्वत:ती वेगळी ओळख प्रस्थापित करण्यासाठी सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा सज्ज झाला आहे. ‘सलमान खान फिल्म्स’ बॅनरअंतर्गत येणाऱ्या या चित्रपटाचं नाव ‘लव्हरात्री’ असं असून त्याचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेत्री वरिना हुसैन आयुषसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

सलमानने ट्विटरच्या माध्यमातून हा टीझर लाँच केला आहे. इंग्रजी, गुजराती, उर्दू आणि हिंदी अशा चार भाषांमध्ये ट्विट करत सलमानने हा टीझर शेअर केला आहे. अभिराज मिनावाला याचं दिग्दर्शन करणार असून दिग्दर्शक म्हणून हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे. यापूर्वी त्याने ‘फॅन’, ‘गुंडे’, ‘जब तक है जान’ यांसारख्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे.

वाचा : ‘या’ पाच कारणांसाठी पाहा सलमानचा ‘रेस ३’ 

आयुष हा सलमानची बहीण अर्पिताचा पती आहे. ‘लव्हरात्री’ हा चित्रपट आयुष शर्मासाठी मोठा ब्रेक मानला जात आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी आयुष गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न करत होता. दमदार पदार्पणसाठी त्याने नृत्य आणि अॅक्शनचेही धडे घेतले.

First Published on June 14, 2018 6:01 pm

Web Title: salman khan launches loveratri teaser aayush sharma warina hussain