सलमानच्या औदार्याचे नवे उदाहरण आता समोर आले आहे. दबंग सलमानने त्याच्या ‘बिग बॉस ७’ या रिअॅलिटी शोचा सेट ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ला दिला आहे. ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या कॉमेडी शोचा सेट जळाल्यानंतर कपिल शर्माला एका सेटची गरज होती. त्यासाठी त्याला सलमानने मदत केली असून ‘बिग बॉस ७’च्या सेटवर या शोचे पुढील काही भागांचे शूटींग करण्यात येणार आहे.
सलमानपूर्वी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान, रोहित शेट्टी यांनीदेखील कपिलला फोन करुन, “हम तुम्हारे साथ है, बताओ कितने दिन मे सेट खडा करना है “, असे म्हटले होते. तसेच, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही कपिलला आर्थिक मदत हवी असल्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. स्वतः लता दीदींनी फोन करणे ही आपल्यासाठी फार मोठी गोष्ट असल्याचे कपिलने म्हटले होते.
कपिलच्या या नव्या सेटवर कंगना,अक्षय कुमार हे ‘रज्जो’ आणि ‘बॉस’ या चित्रपटांच्या प्रमोशनकरिता गेले होते. त्यावेळी कपिलने केलेले ट्विटः