News Flash

वाइल्डलाइफ क्राइम कंट्रोल ब्युरोच्या यादीत सलमान खान ३९ व्या क्रमांकावर

एकंदरीत या यादीकडे लक्ष दिल्यावर क्राइम कंट्रोल ब्युरोचा कारभार किती धिम्या गतीचा आहे हे सर्वांनाच कळून येते

सलमान खान

सलमान खान हे एक असं नाव आहे जे पडद्यावरील सिनेमांमुळे जेवढं चर्चेत होतं तेवढंच किंबहूना त्याहून जास्त या नावाची चर्चा ही पडद्यामागील घटनांमुळे झाली. काळवीट हत्या प्रकरणात सलमानला वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा झाली. या शिक्षेमुळे त्याचे नाव आता वाइल्डलाइफ क्राइम कंट्रोल ब्युरोच्या वेबसाइटवरही झळकलं आहे. या वेबसाइटवर प्राण्यांच्या शिकारीसह, तस्करी आणि त्यासंबंधित गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची नाव लिहिलेली आहेत.

या ब्युरोची स्थापना २००८ मध्ये करण्यात आली. पण आश्चर्य म्हणजे ब्युरोच्या स्थापनेनंतर तब्बल १० वर्षांनी या यादीत फक्त ३९ गुन्हेगारांनाच शिक्षा मिळाल्याची माहिती आहे. एकंदरीत या यादीकडे लक्ष दिल्यावर क्राइम कंट्रोल ब्युरोचा कारभार किती धिम्या गतीचा आहे हे सर्वांनाच कळून येते. हे ब्युरो पर्यावरण आणि वन मंत्रालयाअंतर्गत येते.

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान दोषी ठरला असून न्यायालयाने त्याला पाच वर्षांची शिक्षा आणि १० हजारांचा दंड सुनावण्यात आला. सलमान खानला न्यायालयाने शिक्षा सुनावताच जोधपूर कोर्टाबाहेर ‘सलमान खान मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. बिष्णोई समाजाकडून ही घोषणाबाजी करण्यात आली होती. न्यायालयाने सलमानला दोषी ठरवतानाच या प्रकरणात अन्य आरोपींना दोषमुक्त केले. यामुळे सोनाली बेंद्रे, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान यांना दिलासा मिळाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2018 5:58 pm

Web Title: salman khan listed in wildlife crime control bureau website
Next Stories
1 65th national film awards : ‘न्यूटन’ला मिळालेलं यश छत्तीसगढमधल्या जनसामान्यांचं- अमित मसुरकर
2 …जेव्हा बॉलिवूडचा खिलाडी साताऱ्याच्या उदयनराजे भोसलेंना भेटतो
3 A Kid Like Jake : दुसऱ्या हॉलिवूडपटाच्या ट्रेलरमध्येही अवघ्या काही सेकंदांसाठी झळकली ‘देसी गर्ल’
Just Now!
X