26 October 2020

News Flash

…म्हणून सलमान मुंबईला येऊन काही तासांतच पनवेलच्या फार्महाऊसवर परतला

मंगळवारी तो मुंबईला आला आणि काही तासांतच तो पनवेलच्या फार्महाऊसवर परतला.

सलमान खान

अभिनेता सलमान खान लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी पनवेलच्या फार्महाऊसवर काही कामानिमित्त गेला होता. मात्र तेव्हाच लॉकडाउन जाहीर झाल्याने तो तिथेच अडकून पडला. गेल्या दोन महिन्यांपासून तो पनवेलच्या फार्महाऊसमध्ये राहत आहे. तिथले फोटो, व्हिडीओ तो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. एका व्हिडीओत त्याने मुंबईत राहत असलेल्या आई-वडिलांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. सलमानची ही इच्छा पूर्ण झाली आहे. मंगळवारी सलमान पनवेलहून मुंबईला आला.

मुंबईतल्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये सलमानचे आईवडील राहत आहेत. ‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, योग्य ती परवानगी घेऊन सलमान काही तासांसाठी मुंबईला आला. त्याने आईवडिलांची भेट घेतली आणि नंतर पुन्हा पनवेलच्या फार्महाऊसवर आला. सलमानने सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळल्याचं म्हटलं जातंय. सध्या पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानसोबत बहीण अर्पिला आणि तिचा पती आयुष शर्मा, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, वलुशा डिसूझा, लुलिया वंतूर, भाचा निर्वाण खान राहत आहेत.

 

View this post on Instagram

 

Be Home n Be Safe @nirvankhan15

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

आणखी वाचा : “नवाजुद्दीन व त्याच्या कुटुंबीयांकडून शारीरिक, मानसिक छळ”; पत्नीचे गंभीर आरोप

लॉकडाउनच्या काळात सलमानने काही व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना घरीच राहण्याचं आवाहन केलं. पडद्यामागे रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचीही त्याने मदत केली. इतकंच नव्हे तर पनवेलमधल्या स्थानिकांनाही त्याने अन्नधान्याचा पुरवठा केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2020 4:50 pm

Web Title: salman khan makes quick visit to mumbai checks in on parents after 60 days ssv 92
Next Stories
1 अशोक मामांनी पुन्हा जिंकली मनं, मुंबई पोलिसांसाठी खास आमरस-पुरीच्या जेवणाचा बेत
2 “या चित्रपटामुळे अनन्या होईल देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री”; निर्मातीचा अजब दावा
3 चित्रपट कर्मचाऱ्यांनी ठोठावला सरकारचा दरवाजा; मागितली काम करण्याची परवानगी
Just Now!
X