News Flash

आलियाला किरकोळ दुखापत, सलमानने घेतली भेट

आपण सुखरूप असून, माझा चेहरा व्यवस्थित असल्याचे आलिया भटने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.

बॉलिवूडमधील कलाकारांबद्दल सलमान खान अतिशय संवेदनशील असल्याची अनेक उदाहरणे याआधी ऐकण्यात आली आहेत. आलिया भटच्या दुखापतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला

अभिनेत्री आलिया भट नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यात किरकोळ जखमी झाल्यानंतर लगेचच तिच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अभिनेता सलमान खान तिच्याजवळ पोहोचला. बॉलिवूडमधील कलाकारांबद्दल सलमान खान अतिशय संवेदनशील असल्याची अनेक उदाहरणे याआधी ऐकण्यात आली आहेत. आलिया भटच्या दुखापतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला.
एका पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात परफॉर्मन्स सादर करताना स्टेजजवळील आकर्षक आतषबाजीमुळे आलिया भट किरकोळ जखमी झाली. त्यामुळे ती परफॉर्मन्सनंतर लगेचच आपल्या व्हॅनिट व्हॅनमध्ये गेली. सलमान खानही या कार्यक्रमासाठी तिथेच होता. त्याने लगेचच आलिया भटच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन तिची भेट घेतली आणि तिची विचारपूस करून तिला घरी जाऊन विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, आपण सुखरूप असून, माझा चेहरा व्यवस्थित असल्याचे आलिया भटने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2015 3:07 pm

Web Title: salman khan meets alia bhatt
टॅग : Salman Khan
Next Stories
1 पुढच्या दोन वर्षांत गाजलेल्या हॉलिवूड सिक्वलपटांचा पाऊस
2 सारा तेंडुलकर आणि जस्टिन बीबरचे छायाचित्र व्हायरल
3 पाकिस्तानी कार्यक्रमात शाहरुख, काजोल करणार चित्रपटाची प्रसिद्धी
Just Now!
X