News Flash

नऊ वर्षांनंतर सलमान त्याच्या ऑनस्क्रिन मुलाला भेटतो तेव्हा..

सलमानचा 'पार्टनर इन क्राईम' होता 'रोहन'.

सलमान खान

अभिनेता सलमान खानची भेट घ्यायचे अनेकांचेच स्वप्न आहे. सलमानचे चाहते तर त्याची एज झलक पाहण्यासाठीही त्याच्या घराबाहेर रोजच गर्दी करुन उभे असतात. त्यातीलच एक चाहता म्हणजे सलमानचा ऑनस्क्रिन मुलगा. तब्बल नऊ वर्षांनंतर जेव्हा सलमान त्याच्या ऑनस्क्रिन मुलाला भेटतो तेव्हा त्याच्या काय भावना असतील हे तर खुद्द सलमानच जाणतो. २००७ मध्ये अभिनेता सलमान खान आणि गोविंदा यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘पार्टनर’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले होते. या चित्रपटामध्ये आणखी एका पात्राने अनेकांचेच लक्ष वेधले. ते पात्र म्हणजे लारा दत्ता आणि सलमान खानचा ऑनस्क्रिन मुलगा आणि सलमानचा ‘पार्टनर इन क्राईम’ होता ‘रोहन’.

वाचा: मुलींच्या तोकड्या कपड्यांवर काय म्हणाला सलमान?

‘पार्टनर’ या चित्रपटामध्ये अभिनेता अली हाजीने सलमानच्या मुलाची भूमिका साकारली होती. निरागस आणि लोभस अशा लहान मुलाच्या भूमिकेत दिसलेला अली आता मोठा झाला आहे. पाहताच क्षणी तर, हाच का तो? असाच प्रश्न अनेकांना पडत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान नऊ वर्षांनंतर त्याच्या या ऑनस्क्रिन मुलाला भेटला. अलीने सलमानच्या भेटीचा आनंद त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने सलमानसोबतचे त्याचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

‘बिग बॉस १०’च्या सेटवर अली आणि सलमानची भेट झाली. अलीने आतापर्यंत फक्त ‘पार्टनर’ चित्रपटातच नव्हे तर, काजोल आणि आमिर खान यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘फना’, ‘तारारमपम’, ‘माय फ्रेण्ड गणेशा २’, ‘पाठशाला’ या चित्रपटांमध्येही अलीने काम केले होते. बालकलाकाराच्या रुपात दिसलेल्या अलीचे आताचे रुप पाहता येत्या काही काळात तो सुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण करु शकतो अशा शक्यता सध्या वर्तविण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 10:58 am

Web Title: salman khan meets his onscreen son ali haji after nine years these pics will make you feel so old
Next Stories
1 VIDEO: वाणी-रणवीर करत आहेत ‘खुलके-डुलके प्यार’
2 एक सितार, चार तबले, चार ताल आणि चार राग
3 .. म्हणून गर्दीतही स्वत:ला एकटा समजतो किंग खान
Just Now!
X