‘सैराट’मधील परशाची अर्थात अभिनेता आकाश ठोसर याची बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान यांची नुकतीच भेट झाली. या दोघांच्या भेटीचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, भेटीमागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
दरम्यान, सलमान खानने सैराट चित्रपटाचे भरभरुन कौतुक केले होते. त्यामुळेच सलमानने आकाशची भेट घेतली असावी, असे सांगण्यात येत आहे. आकाश सध्या अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात काम करत आहे. ‘सैराट’च्या संपूर्ण टीमने ‘कपिल शर्माच्या कॉमेडी शो’मध्येही उपस्थिती लावली होती. कपिल्या शोमध्ये पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात सलमान देखील आपल्या सुलतान या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी उपस्थित राहणार आहे.

salman_sairat1