News Flash

‘माझ्या आयुष्यातलं प्रेम गेलं’ -सलमान खान

सलमानच्या आयुष्यातल्या सर्वात जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे.

सलमान खान

सध्याच्या घडीला सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये अभिनेता सलमान खानचं नाव आवर्जुन घेतलं जातं. लोकप्रिय ठरणारा सलमान मैत्रीच्या बाबतही अग्रेसर आहे. बॉलिवूडमध्ये त्याचे अनेक मित्र आहेत. परंतु त्याच्या घरातली एक व्यक्ती त्याच्या सर्वात जवळची आणि बेस्टफ्रेंड आहे. त्याच्या आयुष्यातल्या याच जवळच्या व्यक्तीने जगाचा निरोप घेतला असून सलमानने स्वत: इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली.

सलमानला पाळीव प्राण्यांची प्रचंड आवड आहे. त्यामुळे आजवर त्याने अनेक प्रजातींचे कुत्रे पाळले होते. यात लॅब्राडोर, सेंट बर्नाड आणि नेपोलिटन मस्टिफ या जातीच्या कुत्र्यांचा समावेश होता. या पाळीव प्राण्यांवर त्याचं प्रचंड प्रेम असून ते त्याचे सर्वात जवळचे मित्र असल्याचं  त्याने अनेक वेळा सांगितलं आहे. त्याच्या याच जवळच्या मित्रांपैकी ‘माय लव’चं नुकतंच निधन झालं आहे. माय लवच्या जाण्यामुळे सलमानने त्याच्या आयुष्यातील सर्वात जवळची व्यक्ती गमावल्याचं त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सलमानने सोशल मीडियावर माय लवसोबतचा एक फोटो शेअर केला असून त्याच्या निधनाची माहिती दिली आहे. ‘माझ्या आयुष्यात आता प्रेम उरलं नाही. माझ्या प्रेमाला चिरशांती लाभो’, अशी कॅप्शन सलमानने यावेळी फोटोला दिली आहे.

 

View this post on Instagram

 

My most beautiful my love gone today. God bless her soul.

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सलमानची पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून या फोटोमध्ये सलमान त्याच्या श्वानासोबत दिसून येत आहे. विशेष म्हणजे सलमान ज्याप्रमाणे हातात ब्रेसलेट घालतो अगदी तशीच चेन माय लवच्या गळ्यात दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

Kisses my love…..

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

यापूर्वीही सलमानकडे अनेक प्रजातीचे कुत्रे होते. त्यापैकी ‘माय सन’ आणि ‘माय जान’ हे त्याचे सर्वात जवळचे कुत्रे असल्याचं अनेकांनी पाहिलं होतं. परंतु त्यांचं २०१६ मध्ये निधन झालं. त्यानंतर त्याच्या घरात माय लवचं आगमन झालं. परंतु आज त्यानेही जगाचा निरोप घेतला त्यामुळे तो प्रचंड भावूक झाल्याचं दिसून येत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 12:09 pm

Web Title: salman khan mourns death his friend my love
Next Stories
1 ‘महिला मंडल’मध्ये अक्षय कुमार; विद्या बालन देणार साथ
2 ‘तुला पाहते रे’ मालिकेतील ‘सौ. निमकर’ यांना निळू फुलेंकडून मिळाली ही शिकवण
3 #MeToo : तिच्या चॅटचे स्क्रीनशॉट शेअर करत सुशांत सिंग राजपूतने फेटाळले आरोप
Just Now!
X