सलमान खान आणि त्याच्या चित्रपटांची कमाई हा एरव्हीही चर्चेचा विषय असतो. ‘राधे : युवर मोस्ट वाँटेड भाई’ हा त्याचा चित्रपट दोन वर्षांनी प्रदर्शित झाला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा होणार यातही शंका नव्हती. मात्र यावेळी या कमाईचा ना दणदणाट कु ठे जाणवतो आहे, ना भाईच्या नावाचा उदो उदो होतो आहे. ३०० कोटींची विक्रमी कमाई करणाऱ्या सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटाला यावेळी काही कोटी रुपये जमवतानाही दमछाक झाली आहे.

करोनामुळे बंद असलेली चित्रपटगृहे, ओटीटी आणि पेपर व्ह््यू पद्धतीने झालेले प्रदर्शन यामुळे ‘राधे’ला चांगली कमाई मिळणार नाही, हे स्वत: सलमान खानने जाहीर के ले होते. मात्र या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही हेही वास्तव आहे. चित्रपट ज्या दिवशी ‘झी ५’वर प्रदर्शित झाला, त्यादिवशी तो पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी झाली आणि ‘झी ५’ वाहिनीची यंत्रणा कोलमडून पडली. पहिल्या दिवशी ४२ लाख लोकांनी हा चित्रपट पाहिल्याचे ‘झी ५’कडून अधिकृतरित्या सांगण्यात आले. या चित्रपटासाठी ‘झी’ समूहाने सलमानच्या कं पनीबरोबर आणखी काही चित्रपटाच्या करारांसह २३० कोटी रुपयांचा करार के ला होता असे सांगितले जाते. यात चित्रपटाच्या निर्मितीचा खर्चच जवळपास ९० कोटीपर्यंत जातो. हा खर्च वसूल करण्यासाठी चित्रपटगृहातून प्रदर्शन हाच खरा उपाय होता. मात्र करोना परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही.

डिजिटल प्रदर्शन वगळता भारतात हा चित्रपट के वळ तीनच चित्रपटगृहांमधून प्रदर्शित झाल्याचे सांगण्यात येते. पहिल्याच दिवशी कमीतकमी १०० कोटींच्या आसपास कमाई करणाऱ्या सलमानच्या चित्रपटाला यंदा काही हजार रुपयांच्या पुढे पल्ला गाठता आला नाही. अर्थात, देशभरात चित्रपटगृहांमधून होऊ न शकलेले प्रदर्शन हे यामागचे मुख्य कारण आहे. या चित्रपटाच्या डिजिटल प्रदर्शनालाही तेवढाच प्रतिसाद मिळाला असता तर अशा अनेक रखडलेल्या हिंदी चित्रपटांच्या ओटीटी प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला असता.

‘राधे’ परदेशातही ४० देशांमधून प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाला दुबई, अमेरिका, ऑस्ट्रेलिया जिथे सलमानचा मोठा चाहतावर्ग आहे तिथे जास्तीत जास्त प्रतिसाद मिळेल, असा निर्मात्यांचा अंदाज होता. त्यातही दुबई वगळता अन्य ठिकाणी या चित्रपटाला फारशी कमाई करता न आल्याने निर्मात्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. दुबईत पहिल्या आठवड्याच्या अखेरपर्यंत या चित्रपटाने १३.७ कोटी रुपयांची कमाई के ली होती. ऑस्ट्रेलियात पहिल्या आठवड्याच्या अखेरीस २.२१ कोटींची क माई झाली, तर यूएसएमध्ये अगदी कमी म्हणजे १.६ कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाला करता आली. अजूनही या चित्रपटाचे खेळ तेथील चित्रपटगृहांमधून सुरू आहेत, पण प्रेक्षकसंख्या कमी झाल्याने अधिक कमाई करण्याची फार आशा निर्मात्यांना नाही. या चित्रपटाने पहिल्यांदाच एकाचवेळी चित्रपटगृहातून आणि पे पर व्ह््यू पद्धतीने प्रदर्शित होण्याचा प्रयोग के ला होता. टाटा स्काय, डीटीएचसारख्या सेवा किं वा ‘झी प्लेक्स’सारखी पैसे मोजून चित्रपट पाहण्याची सेवा देणारी यंत्रणा या चित्रपटासाठी अजून पुरेशी फळलेली दिसत नाही. एकू णच सलमानच्या चित्रपटाचा जो डंका चित्रपटगृहातून वाजतो तो डिजिटली वाजू शकलेला नाही. त्यामुळे पुढच्यास ठेच… या उक्तीप्रमाणे मोठ्या हिंदी चित्रपटांचे निर्माते ओटीटी प्रदर्शनाचा निर्णय लांबणीवर टाकतील असेच चित्र दिसते आहे.