21 January 2019

News Flash

बॉबी देओलचे झाले बारसे, सलमानने ठेवले ‘हे’ नाव !

'रेस ३'च्या निमित्ताने ब-याच कालावधीनंतर बॉबी देओल रुपेरी पडद्यावर येत आहे.

बॉबी देओल

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या वाटेत येणाऱ्या अनेक गोष्टींवर मात करत पुन्हा एकदा आपल्या आगामी ‘रेस ३’ या चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. नुकताच ‘रेस ३’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून यावेळी सलमानने बॉबी देओलला नवे नाव दिले. ‘रेस ३’च्या निमित्ताने ब-याच कालावधीनंतर बॉबी देओल रुपेरी पडद्यावर येत आहे. पण, त्याला असे नवे नाव देण्यामागचे कारण काय, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.

काही काळ चित्रपटसृष्टीपासून लांब राहिलेला बॉबी अजूनही त्याच्या अभिनयाबरोबर पिळदार शरीरयष्टीमुळे ओळखला जातो. सध्या या चित्रपटामध्येही त्याच्याच सिक्सपॅकची चर्चा होत आहे आणि याच कारणामुळे बॉबीला त्याचं हे नवं नाव मिळालं आहे.  ‘रेस ३’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यावेळी सलमानने बॉबी देओलचे तोंड भरुन कौतुक केल्याचे दिसून आले. या चित्रपटामुळे अनेक वर्षानंतर बॉबी आणि सलमान एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. सलमानच्या सिक्सपॅकची सतत चर्चा सुरुच असते मात्र यावेळी चक्क सलमानबरोबर बॉबीच्या सिक्सपॅकचीही चर्चा होत आहे. या चित्रपटातील साहसदृश्य करण्यासाठी बॉबीने जीममध्ये बराच घाम गाळल्याचे दिसून येत आहे. त्याच्या याच मेहनतीमुळे सलमानने त्याला बॉबी देओलच्या जागी ‘बॉडी देओल’ असे नाव दिले आहे.

‘रेस ३’च्या ट्रेलर लाँचवेळी सलमानला अनेक प्रश्न विचारण्यात आले मात्र यावेळी देखील त्याने काही प्रश्न कटाक्षाने टाळल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे हा चित्रपट करताना मला अभिनेता धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांची आठवण येत असल्याचे सलमानने सांगितले. धर्मेद्र आणि अमिताभ बच्चन यांचे प्रत्येक चित्रपट हिट ठरले आहेत. त्याचे चित्रपट पाहत असताना अनेक चाहते मोठमोठ्याने टाळ्या वाजवत कलाकरांना प्रोत्साहन देत असंत. ‘रेस ३ ‘ हा चित्रपट देखील असाच हिट ठरणार असून प्रेक्षकही चित्रपटातील कलाकारांना असेच प्रेम देतील, असे सलमान म्हणाला. रेमो डिसूझा दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर, बॉबी देओल, डेझी शाह अशी स्टारकास्ट असणार आहेत.

First Published on May 17, 2018 8:54 am

Web Title: salman khan new name bobby deol race 3