News Flash

सलमानची भाची अलीजे करणार सनी देओलच्या मुलासोबत बॉलिवूडमध्ये एण्ट्री

जाणून घ्या सविस्तर

गेल्या अनेक दिवसांपासून स्टारकिड्सने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. अजूनही अनेक स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणार अशा चर्चा सुरू आहेत. त्यातच आता एक नवीन नाव समोर आलं आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची भाची अलीजे अग्नीहोत्रीच. अलीजे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटात सनी देओल यांचा मुलगा राजवीर देओल हा अलीजेसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अनेक कलाकार असणार आहेत. हा चित्रपट रोमॅन्टिक-कॉमेडी असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजश्री प्रॉडक्शनचे सूरज बडजात्या यांचा मुलगा अवनीश करणार आहे. अवनीश या चित्रपटातून चित्रीकरणात एण्ट्री करणार आहे. त्यामुळे या एका चित्रपटातून दोन स्टारकिड्सची बॉलिवूडमध्ये एण्ट्री होण्याची शक्यता आहे.

मात्र, या बद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या आधी ही अलीजे सलमानच्या ‘दबंग ३’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा सुरू होती. अलीजे तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे अनेक वेळा चर्चेत असते. अलीजे ही अतुल अग्निहोत्री आणि अल्विरा खान यांची मुलगी आहे. खान कुटुंबातील नातवंडांमध्ये सगळ्यात मोठी ही अलीजेच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2021 7:53 pm

Web Title: salman khan niece alizeh and sunny deol son rajvir to make bollywood debut with avnish barjatya dcp 98
Next Stories
1 सलमान खान पोहोचला लिलावती रुग्णालयात, जाणून घ्या कारण
2 अच्युत पोतदार ठरले ‘झी मराठी अवॉर्ड २०२०-२१’ जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी
3 अरबाज खानने मलायका अरोराला पाठवले खास गिफ्ट, जाणून घ्या कारण
Just Now!
X