News Flash

सलमान खान यंदा साजरा करणार नाही वाढदिवस

जाणून घ्या सलमान वाढदिवशी काय करणार..

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा २७ डिसेंबर रोजी वाढदिवस असतो. सलमानच्या वाढदिवसाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. तसेच तो त्याचा ५५ वा वाढदिवस कसा आणि कुठे साजरा करणार या कडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दरवर्षी सलमान त्याचा वाढदिवस पनवेल येथील फार्म हाऊसवर धूमधडाक्यात साजरा करतो. पण यंदा सलमान त्याचा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे समोर आले आहे. वाढदिवशी सलमान त्याच्या आगमी चित्रपटाचे चित्रीकरण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

नुकताच ‘स्पॉटबॉय’ने दिलेल्या वृत्तानुसार सलमान यंदा वाढदिवस साजरा करणार नाही. सलमानच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘असे पहिल्यांदा होणार आहे की सलमान त्याचा वाढदिवस त्याच्या फार्महाऊसवर साजरा करणार नाही. सलमान त्याच्या घरी वाढदिवस साजरा करणार असल्याच्या चर्चा मी ऐकल्या. पण मला जितकी माहिती आहे त्यानुसार सलमान पहिल्यांदाच त्याचा वाढदिवस साजरा करणार नाही.’

पुढे तो म्हणाला, ‘सलमान त्याचा आगामी चित्रपट अंतिमचे चित्रीकरण सुरु ठेवणार आहे. तो वाढदिवसाच्या दिवशी आणि ३१ डिसेंबर रोजी देखील चित्रीकरण सुरु ठेवणार आहे.’

दरवर्षी सलमान मोठ्या थाटामाटत त्याचा वाढदिवस २७ डिसेंबर रोजी पनवेलच्या फार्महाऊसवर साजरा करताना दिसतो. तो तेथे पार्टीचे आयोजन करतो. बॉलिवूडमधील अनेक कलाकार या पार्टीला उपस्थित असल्याचे पाहायला मिळते. पण यंदा सलमान त्याचा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे समोर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 4:43 pm

Web Title: salman khan not to celebrate his birthday this year avb 95
Next Stories
1 अंकिता लोखंडेचा विना मेकअप फोटो व्हायरल
2 ‘गोवा शॉर्टफिल्म फेस्टिव्हल’ मध्ये ‘पुनरागमनाय च’आणि ‘आशेची रोषणाई’ची बाजी; पटकावले ‘हे’ पुरस्कार
3 “शेतकरी तुला दहशतवादी वाटतात का?”; कंगनाच्या ट्विटवर दिलजीतनं दिलं जोरदार प्रत्युत्तर
Just Now!
X