News Flash

काळ्या मातीत मातीत! सलमान करतोय शेतात काम; शेतकऱ्यांनाही केला सलाम

‘जय जवान, जय किसान’ म्हणत सलमानने जोडलं काळ्या मातीशी नातं

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान लॉकडाउनच्या काळात आपल्या कुटुंबियांसोबत पनवेलच्या फार्महाऊसवर थांबला आहे. या काळात तो शेतात काम करुन आपलं मन रमवताना दिसत आहे. नुकताच त्याने शेतात काम करतानाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमुळे चाहत्यांमध्ये सलमानची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

अवश्य पाहा – सोनू सूद करणार अपघातग्रस्त ४०० मजुरांची मदत; प्रशासनाकडे मागितली माहिती

 

View this post on Instagram

 

Respect to all the farmers . .

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

अवश्य वाचा – आणखी एका कलाकाराची आत्महत्या; २७ व्या वर्षी गोळी घालून संपवलं आयुष्य

सलमान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो, व्हिडीओज, ट्विट्स यांच्या माध्यमातून तो कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहातो. यावेळी त्याने देशातील शेतकऱ्यांना सलाम करण्यासाठी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये सलमान चिखलाने माखलेला दिसत आहे. “देशातील शेतकऱ्यांना मानाचा मुजरा” अशा आशयाची कॅप्शन त्याने या फोटोवर लिहिली आहे.

यापूर्वी देखील सलमानने असाच एक फोटो शेअर केला होता. “दाने दाने पे लिखा होता हैं, खाने वाले का नाम. जय जवान, जय किसान”, अशी कॅप्शन त्याने या फोटोवर लिहिली होती. सलमानचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सलमान लवकरच ‘राधे’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दिशा पटानी, रणदीप हुड्डा हे कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 5:45 pm

Web Title: salman khan offers his respect to all the farmers mppg 94
Next Stories
1 या दिवशी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलिज होणार विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’
2 रेखा यांच्या बंगल्यानंतर झोया अख्तरची इमारतही केली सील
3 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोस्टवरून केतकी चितळेच्या अडचणीत वाढ
Just Now!
X