30 September 2020

News Flash

शाहरूखमुळेच कतरिनानं मला होकार दिला – सलमान खान

मैत्रीखातर ऐनवेळी सलमानच्या आगामी चित्रपटात काम करायला कतरिना चटकन तयारही झाली.

सलमान- कतरिना

सलमान आणि कतरिना या दोघांच्या प्रेमाची चर्चा काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये होती. खरं तर सलमानमुळेच कतरिनाला बॉलिवूडमध्ये नव्या संधीचे दार खुले झाले. त्यांच्या प्रेमकहाणीला किनारा काही लाभला नाही, प्रेम तुटलं तरी दोघांची मैत्री मात्र कायम राहिली आणि याच मैत्रीखातर ऐनवेळी सलमानच्या आगामी चित्रपटात काम करायला कतरिना चटकन तयारही झाली.

पण, या होकारात शाहरूखचाही वाटा मोठा होता. ‘भारत’ चित्रपटाच्या चित्रिकरणाला अवघे पाच दिवस बाकी असताना प्रियांका चोप्रानं या चित्रपटाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे सलमाननं कतरिना कैफला या चित्रपटासाठी विचारलं. इतक्या कमी वेळेत कतरिनानंही चित्रपटाला होकार दिला. यात शाहरुखचा मोठा वाटा होता. कतरिना शाहरूखच्या ‘झिरो’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. या वर्षाअखेर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे ‘झिरो’च्या चित्रिकरणात कतरिना व्यग्र आहे.

असं असताना केवळ सलमानच्या चित्रपटात काम करण्यासाठी शाहरूखनं तिला वेळ दिला आहे. या दोन्ही चित्रपटाच्या वेळा शाहरुखनं सांभाळून घेतल्या आहेत. त्याच्यामुळेच कतरिनानं मला होकार दिला असं म्हणत सलमाननं शाहरूखचेही आभार मानले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2018 10:19 am

Web Title: salman khan on katrina kaif joining bharat
Next Stories
1 आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांना राखीचं सडेतोड उत्तर
2 बाप झाल्यानंतर एका तासांत शाहिदचे अकाऊंट हॅक; कतरिनावर आक्षेपार्ह ट्विट
3 आता येणार ‘अरेंज मॅरेज’ चा ट्रेंड!
Just Now!
X