17 December 2017

News Flash

सलमानची अॅमी जॅकसनला पसंती

तुला सलमानला डेट करायला आवडेल का? या प्रश्नावर तिने...

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: March 21, 2017 5:16 PM

सलमान खान आणि अॅमी जॅकसन हे खूप चांगले मित्र आहेत हे तर सगळ्यांनाच माहित आहे. अॅमी जॅकसनचे येणारे प्रत्येक सिनेमे सलमान आवर्जुन सोशल मीडियावर प्रमोट करत असतो. आता ५१ वर्षीय या भाईजानने अॅमीला त्याच्या बीईंग ह्युमनचा नवा चेहरा बनवला आहे. अॅमीने सलमानसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यात तिने, बीईंग ह्युमन संस्थेशी जोडले गेल्याचा सर्वाधिक आनंद होत आहे. सलमान तू सर्वोत्कृष्ट आहेस. या फोटोमध्ये सलमान आणि अॅमी एकमेकांसोबत आनंदी दिसत आहेत.

सलमानला अॅमीसोबत साजिद नाडियाडवाला यांच्या किकमध्ये एकत्र काम करायचे होते. पण अॅमी शंकर यांच्या आय या सिनेमाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र होती, त्यामुळे ती या सिनेमात काम करु शकली नाही. सोहल खानच्या फिक्री अली या सिनेमात अॅमीने काम केले होते.
अॅमीला सलमानही तेवढाच जवळचा मित्र वाटतो. एका मुलाखतीत अॅमीने सलमानबद्दल बोलताना असेही सांगितले होते की, कोणत्याही मुलीला सलमानसोबत डेट करायला आवडेल. तो माझा खूप चांगला मित्र आहे. माझ्यात आत्मविश्वास वाढवण्याचे काम त्याने केले. २.० या सिनेमाच्या टिझर प्रदर्शन कार्यक्रमावेळीही अॅमीला पाठिंबा देण्यासाठी सलमान त्या कार्यक्रमान निमंत्रण नसतानाही गेला होता.

img_8182

img_8188

img_8189

img_8190

img_8191

तुला सलमानला डेट करायला आवडेल का? या प्रश्नावर तिने, कोणाला सलमानला डेट करायला आवडणार नाही असे उत्तर दिले होते.
काही दिवसांपूर्वी अॅमी जॅकसनचा फोन हॅक करण्यात आला होता. त्यामुळे तिच्या फोनमधले तिचे काही खासगी फोटोही व्हायरल झाले होते.

First Published on February 17, 2017 7:17 pm

Web Title: salman khan picks amy jackson as the new face of his brand being human see pics